राहू बेटात दहशती विरोधात रणशिंग फुंकले !
आमदार राहुल कुल यांच्यावर अप्रत्यक्ष ‘पीके’ची जोड उठवत जोरदार हल्लाबोल**
आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
दहशत, दडपशाही आणि राजकीय मक्तेदारीच्या विरोधात आम्ही आता थेट रिंगणात उतरलो आहोत, असा घणाघाती एल्गार करत राहू बेटातील कैलास गाढवे यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर अप्रत्यक्षपणे ट केची झोड उठवली.
“ज्यांना कारखाना चालवायचा दम नव्हता, त्यांनी तो चालवायला दिला,” असा खोचक टोला लगावत त्यांनी स्थानिक राजकारणातील कारभारावर घणाघाती प्रहार केला.
खामगाव येथे ग्रामदैवत खंडेश्वराच्या चरणी प्रचाराचा नारळ अर्पण करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली. गावच्या मुख्य चौकात झालेल्या या सभेला माजी आमदार रमेश थोरात, महेश भागवत, वैशालीताई नागवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद उमेदवार सागर शेलार, पंचायत समिती उमेदवार योगेश मदने आणि राहू गणातील स्त्री उमेदवार शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. या प्रसंगी गाढवे यांनी मनोगत व्यक्त करताना खोचक टोला लावून मागील कुल यांच्या राजकीय अनेक भानगडींचा पाढा वाचल
निवडणूक लांबणीवर टाकण्यावरून काकासाहेब तापकीर यांनी प्रशासनावर थेट आरोप करत सांगितले,
“लोकशाहीला घाबरणारे हे प्रशासन आहे. म्हणून निवडणुका लांबवल्या गेल्या. यामुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे!”
यावेळी त्यांनी राहू गटातील अनेक कारणाने वाचून दाखवत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.
धर्म-जातीत भांडण लावणाऱ्या सत्तेला आळा घालण्यासाठी अजित पवार गटाला विजयी करा – आवाहन
सध्याचे सरकार समाजात धर्मा-धर्मात, जाती-जातींत भांडणे लावून वातावरण बिघडवत आहे. याला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
विशेष म्हणजे, राहू गटातील अनेक मान्यवर प्रथमच अजितदादा पवार गटाच्या प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र यावेळी दिसले.
जिल्हा परिषद उमेदवार सागर शेलार म्हणाले,
“मी मिरवडी या छोट्या गावात राहतो. गाव लहान आहे, पण जनतेचा माझ्यावर मोठा विश्वास आहे. सामाजिक कार्याचा वसा हा माझा पिंड आहे. प्रामाणिक पणामुळेच मला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली.”
जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या अनेक विकास योजनांपासून राहू बेटातील सामान्य नागरिक व शेतकरी वंचित राहिले आहेत, ही खंत व्यक्त करत त्यांनी आगामी काळात प्रामाणिकपणे सेवा-सुविधा पोहोचवण्याचा शब्द दिला.
“मी सरपंच असताना स्वतःचा डबा बांधून ग्रामपंचायतचा कारभार केला. आहे माझी भरभराट व्हावी असे काम केले नाही त्या कामाची दखल घेत आज मला जिल्हा परिषद उमेदवारी मिळाली – ही पदाची संधी नसून समाजसेवेची नामी संधी आहे,” असेही ते म्हणाले.
लोकसेवक म्हणजे जनतेच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा माणूस असतो, अशी भूमिका मांडत त्यांनी राहू बेटातील राजकीय दहशतीवर अप्रत्यक्ष प्रहार केला.
“आजची गर्दी पाहून तुमचं प्रेम आयुष्यभर विसरणार नाही,” असे भावनिक आवाहन त्यांनी शेवटी केले.
“मागचा जि.प. सदस्य दाखवा आणि हजार रुपये घ्या!” – नागवडेंचा थेट आरोप
वैशालीताई नागवडे यांनी भर चौकात थेट सवाल उपस्थित करत सांगितले,
“मागचा जिल्हा परिषद सदस्य दाखवा आणि हजार रुपये घ्या!”
मागील उमेदवार हे रिमोट कंट्रोलवर चालणारे होते, तर आत्ताचे उमेदवार रिमोट कंट्रोल नसून जनतेच्या नियंत्रणात असतील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
रमेश थोरात म्हणाले,
“स्व. सुभाष कुल यांना आमदार बनवताना तालुक्यातील जनतेने वर्गणी करून त्यांना उभे केले. त्याचा मी साक्षीदार आहे. 2001 नंतर राजकारणाची दिशा बदलली, त्यावर भाष्य करणार नाही – झालेल्या गोष्टी गंगेला वाहिल्या.”
राजकारणातील उणिवा शोधण्यापेक्षा सामाजिक कार्याचा वसा घेऊन पुढे जाण्याचा सल्ला देत तिन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभा रंगली, राजकीय धग वाढली
महेश भागवत, नितीन दोरगे आदींनी मनोगत व्यक्त केले.
आभार प्रदर्शन सखाराम शिंदे यांनी केले.सूत्र संचालन संतोष नागवडे यांनी केले सुरवातीला गावच्या ग्रामदेवला देशांसाठी गेलेल्या या गटातील.उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणांत शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते



