मुतारी तोडणाऱ्यानी मोक्याच्या जागा सुद्धा बळकावल्या ! म्हणून शहराचा विकास पळून गेला !बाबा उर्फ करीम शेख

आवाज लोकशाहिचा
विशेष वृत्त.दौंड
मोक्याच्या जागांवर कब्जा करायचा आणि नागरिकांची दिशाभूल करीत शहराबाहेरील जागांवर आम्ही तुमच्या सुखसोयी करतोय असा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांनी विकासाची वाट लावून स्वतःच्या विकासाचे साधन म्हणून दौंड पालिकेचा वापर केला आहे म्हणूनच या शहरातील विकास त्यांच्या धास्तीने पळून गेला आहे .
विकास दाखवा आणि हजार रुपये मिळावं असे फलक लावले पाहिजेत असा घणघणाती आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख यांनी केला आहे .
अनेक वर्षा पासून सत्तेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागा असलेल्या प्रस्थापितांनी नागरिकांच्या विकासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेले आहेच मात्र शहरातील पालिकेच्या मोकळ्या जागा आणि शाळेच्या खेळांच्या जागा स्वतःच्या भल्या साठी आणि आर्थिक मिळकती साठी बळकावल्या आहेत.

शहराच्या विकासाची चाके नक्की कुठे रोवलेली आहेत आणि त्याच्या पाठीमागे कोण राजकारण करीत दिशाभूल करीत आहे याचा भांडा फोड करण्याचा प्रयत्न केला आहे .
शहराच्या विकासाच्या नावावर आज निवडणुकीत जाहीर नामा नागरिकांच्या साठी काढला  जातो मात्र प्रत्यक्षात त्यात दिशाभूल करणारी माहिती टाकताना त्यांच्या अंधभक्ताना करवी नागरिकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करतात असा परखड आरोप शेख यांनी करताना अनेक वर्षांच्या शहरातील काही भानगडी आणि त्याच्यांमागील राजकारण याचे पोल खोल करताना म्हणाले,
शहरातील सात मुतारी पडणाऱ्यांनी लोकांची महत्वाची गैरसोय केलेली असताना शाळेच्या खेळाचे मैदान असलेल्या ठिकाणी इमारत बांधली आणि त्यात वाणिज्य व्यावसायिकांना भाड्याने देऊन पैसे कमावण्याचा धंदा उभारलेला आहे  मी त्याची तक्रार उचित प्रशासनाकडे केलेली आहे मात्र लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय
.मुलांच्या खेळाच्या जागा या निमित्त काबीज करणारे आणि त्यांना आशीर्वाद देणारे म्हणतात प्रशस्त मैदान बनवत आहोत ही बाब लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी आहे .
शहरात अनेक वर्ष सत्तेत सहभागी असलेल्या प्रस्थापितांनी मोठी दहशत निर्माण केलेली आहे नागरिकांना त्यांची भीती आहेच मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांच्या दहशतीखाली नमलेले आहेत असा गप्प स्पोट सेक करताना म्हणाले राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार आहे या तालुक्यात लोकप्रतिनिधी भाजपाचा आहे त्यांचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ वजन आहे आणि तेच स्वतःच्या तालुक्यातील या शहरात पक्षाचा उमेदवार उभा करू शकत नाहीत याची साक्ष देणारी आहे तालुक्याचा आमदार स्वतःच्या तित्वासाठी या दहशतीपुढे नवलेत की काय असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो तालुक्याच्या आमदारांना सुद्धा या दहशतीचा फटका बसला आहे असा माझा सरळ सरळ आरोप आहे असे सुद्धा त्यांनी सांगून भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्याकडे बोट दाखवीन या शहरातील दहशतीच्या राजकारणाचे उदाहरण दिले.
सामाजिक तेर निर्माण करायची आणि धार्मिक तिढे निर्माण करून शहरातील बंधूभाव असलेल्या नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण करायचे यातून मी मार्ग काढतो असे सांगून पोलिस प्रशासनाचा वापर करीत नागरिकांना एखाद्या भानगडीत अडकून ठेवून त्याला वेठीस धरायचे हा प्रस्थापितांचा सध्याचा राजकीय अजेंडा बनला आहे .
आपल्याला हवा असलेला कार्यकर्ता मिळत नसला की त्याला प्रशासनाच्या धाकात आपल्या पायाशी लोटांगण घेण्यासाठी परावृत करायचे ही राजकीय नीती शहराच्या तरुणाईला बदनाम.करीत आहे .आपली बदनामी.नको यातून सुटका व्हावी म्हणून अनेक तरुण व्यवसाय उद्योग सोडून त्यांचे भक्त म्हणून काम करीत आहेत .त्यांना आपले मत व्यक्त करता येत नाही अशी अवस्था शहराच्या तरुणाईची आहे .
विकास कामांच्या निधींचे आकडे कोटींचे दाखवता मात्र प्रत्यक्षात कामांचा आढाव पाहिल्यास भ्रष्ट कारभार आणि बगलबच्याचा प्रचार करून त्याबाबत कोण बोलणार नाही आरोप करणार नाही म्हणून केलेली व्यवस्था या शहराच्या विकासला कॅन्सरच्या रोगासारखी आहे.
हे शहर आणि त्याची सध्याची दुरावस्था केवळ आणि केवळ प्रस्थापितांच्या नालायक राजकारणाने झालेली असून त्यांच्या अनेक वर्षांच्या सत्तेतील कारभाराची दहशत असल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिणामी सत्य समोर असताना त्याबाबत कोणीच बोलत नाही म्हणून शहराच्या विकासाचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजले आहेत .
नुसती शहरातील जनता दहशतीचा बळी ठरलेली नाही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा त्याचा फटका सहन करावा लागतोय म्हणूनच सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचा उमेदवार आणि चिन्ह कपाटात घालून बंद करावे लागते  या पेक्षा दुसरा दाखला दुसरा नाही असा सवाल शेख उपस्थित करून म्हणता विकासाच्या मोक्याच्या जागा बळकवणाऱ्या प्रस्थापितांनी लोक सेवेच्या गप्पा मारू नयेत आणि मतदारांची दिशाभूल.करू नये म्हणूनच माझे.तीन शिलेदार म्हणून पंज्या या चित्रावर उभे केले आहेत त्यांना मतदान करून निवडून द्या बदल काय असतो ते आम्ही दाखवून देऊ असे आवाहन केले आहे