आवाज लोकशाहीचा — दौंड निवडणूक वार्तापत्र
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला गती मिळत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेने काल शहरातील वातावरण तापवले. विकासाच्या मुद्द्यावर पवारांनी नेमकेपणाने आणि कटू शब्दांत विरोधकांना सवाल केला.
सभेतील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं वाक्य म्हणजे पवारांचे आव्हान,
विकासाच्या नावावर मिळालेला निधी कागदावरच फिरला. इथं निधीला पाय फुटतात आणि कामांचा दर्जा संपतो. विकास मी केलाय, बारामती-पिंपरी चिंचवड याची साक्ष आहेत. तुम्ही काय केलं, ते सांगा!”
घड्याळ आणि मित्रपक्षांच्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांना थेट खडसावले.
दौंडची कचरा समस्या — “मी २५ लाखांत यंत्रणा बसवली; मग इथं कचरा का संपत नाही?”
पवार म्हणाले—
“दौंडच्या पूर्व भागात, दौंड शुगर कारखान्यावर मी पंचवीस लाखांत कचरा प्रक्रिया यंत्रणा बसवली. ट्रॅकभर कचरा टाका, पोतभर भुगा तयार होतो. लोखंड, काच, दगड सोडला तर सर्व प्रकारचा कचरा यात जाऊ शकतो. मग शहराचा कचरा अजूनही गल्लीबोळात का पडला आहे
असे सांगताना अजित पवारांनी थेट वचन दिले आणि म्हणाले
“तुम्ही एकदाच माझ्या विचारांचे पॅनल आणि नगराध्यक्ष निवडून द्या. पहिल्या सहा महिन्यांत प्रयोग दाखवतो. तीन वर्षांत शहराचा कायापालट करणारा आराखडा तयार आहे.”
त्यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे यांचा उल्लेख करत सांगितलं—
“शहरासाठी योग्य, सुशिक्षित, तडफदार महिला आम्ही उभी केली आहे. आमचे सर्व उमेदवार निष्कलंक आहेत, कोणताही अवैध धंदा नाही. जुन्या-नव्यांची योग्य सांगड घातली आहे.”
विरोधकांवर थेट टीका — “अनेक वर्ष दिलेल्या सत्तेने तुमचीच फसवणूक केली”असा उल्लेख करीत
पवारांचा हल्ला इथेच थांबला नाही. ते म्हणाले—
“ज्यांना तुम्ही अनेक वर्ष सत्तेत बसवलं, त्यांनी आलेल्या निधीचा कसा वापर केला हे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या हातून निधीला पाय फुटले. शहरात कोणताच प्रश्न सुटला नाही… ही दौंडकरांची मोठी फसवणूक आहे.”
भाजप सोबतच्या सहयोगाचा उल्लेख करताना म्हणाले निधीची तरतूद करायला मी कमी पडणार नाही”
ते म्हणाले
“मी सध्या भाजपाचा सहयोगी मंत्री आहे. राज्य आणि केंद्र, दोन्हीकडे माझी ओळख आहे. त्यामुळे दौंडला लागणारा निधी आणायला मी कुठेही अडणार नाही. पालकमंत्र्यांची जबाबदारीही मी घेतो.”
टपऱ्या – घरे – व्यवसायिकांची उदाहरणे देत संवेदनशील मुद्दा हाती घेऊन बोलताना म्हणाले
विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत
“काही ठिकाणी टपऱ्या, घरे पाडावी लागली; पण मी कुणावर अन्याय होऊ दिला नाही. व्यवस्था करून दिली. दौंडमध्येही त्याच पद्धतीने न्याय मिळेल.”
या विधानाने पूर्वीच्या टपराधारकांच्या प्रश्नाचा पुन्हा राजकीय ठसा उमटवला.
सभेच्या सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष राजेश जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपातून आलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
दुर्गादेवी जगदाळे यांची भावनिक हाक त्या आपल्या भाषणात म्हणाल्या
अजितदादांच्या पाठबळावर आम्ही रुतलेला विकास मुक्त करणार आहे दौंड शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू. आम्हाला भरभरून मते द्या.”
नंदू पवार, अश्विन वाघमारे, प्रणोती चलवादी, राजेंद्र खट्टी, जीवराज पवार आदी उमेदवारांनी मनोगते व्यक्त केली.



