शहरातील सात मुतारी पडल्या कोणी.याचे पातक कोणाचे! .बाबा उर्फ करीम शेख,

आवाज लोकशाहीचा – दौंड नगरपालिका विशेष वृत्त
विजय चव्हाण
दौंड शहरात “मुतारी नाही” असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात असताना, वास्तव मात्र पूर्णपणे भलतेच असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ माजी शहराध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख यांनी समोर आणलेल्या तथ्यांवरून स्पष्ट होते. शहरात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सातही मुताऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कृपेने जाणूनबुजून मोडीत काढण्यात आल्या, असा गंभीर आरोप शेख यांनी केला आहे.
शहरातील सात मुताऱ्यांचा इतिहास आणि अदृश्यता
शहरात पूर्वी खालील सात महत्त्वाच्या ठिकाणी लघुशंकेची सोय होतीः  जुनी एसटी स्टँडसमोर.  हिंद टॉकीजच्या कॉर्नरवर.  शे, ज्यो ,विद्यालयाच्या कोपऱ्यावर.  प्रकाश वुलन लगत (आंबेडकर चौक). पोलीस स्टेशन मागच्या भिंतीला उत्तरेकडे.   शिवाजी चौक प्रकाश जे कापड दुकान मागील गल्लीत.  जुन्या भाजी मंडई मधील अशा सात होत्या
ही सर्व मुताऱ्या अचानक गायब झाल्या. नगरपरिषदेतील काही बगल बच्च्यांच्या हितासाठी शहरातील मूलभूत सुविधा मुद्दाम नष्ट केल्या गेल्या, असा गंभीर आरोप शेख यांनी नोंदवला आहे.
शेख म्हणतात— “शहरात मुतारी नसल्याचा बाऊ झाला मात्र  जनतेला खोटे सांगणारे सत्ताधारीच, खरी सोयची गैरसोय  करण्याचे पाप केलेल्या आहेत. ही केवळ मुतारीची बाब नाही… शासननिधीतून झालेली अनेक विकासकामेच खाजगी स्वार्थासाठी मातीमोल करण्यात आली आहेत.”
शहरातील आरक्षित जागा, पार्किंगची व्यवस्था, रस्त्यांची रुंदी, नगररचना विभागातील निर्णय—सगळीकडे ‘मलिदा’ घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि राजकीय बगलबच्च्यांचे वर्चस्व असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
“कचरा चोर टोळी पालिकेत घुसली आहे” – शेख यांचा थेट आरोप
स्वच्छतेच्या टेंडरवरून ‘लगीन घाई’ झाल्याचे आणि तो विषय थेट न्यायालयापर्यंत गेल्याचे सांगत शेख म्हणतात, “पालिकेमध्ये प्रत्यक्ष कचरा चोरी करणारी टोळी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराची स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळली.”

नगररचना विभागातील माजी सेवानिवृत्त अधिकारी आणि प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी मिळून शहराच्या रचनेचा संपूर्ण बोजवारा उडविल्याचा आरोप करताना शेख म्हणतात— “इमारतींच्या परवानग्यांमध्ये पार्किंगचा विचारच केला नाही. आज रस्त्यावर वाहनांचे तांडे उभे राहून वृद्ध, महिलां, विद्यार्थ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
प्रश्न विचारणाऱ्यांना दाबणारी ‘सत्तेची दहशत’
“येथील राजकारणी गेल्या 50 वर्षांपासून सत्तेच्या बळावर दीनदलित, वंचित, गरीबांच्या डोक्यावर पाय ठेवून बसले आहेत. लोकांना भीती वाटते म्हणून ते विरोध करू शकत नाहीत,” असा शेख यांचा आरोप.
“जनता फसली… आणि शहर कोसो दूर गेले विकासापासून”
— तरुणांना रोजगार नाही — व्यापाऱ्यांना ग्राहक नाही — ग्राहकाला पार्किंग आणि लघुसंकेतोंची सोय नाही — रस्त्यांची मोडतोड — पाणीपुरवठा रात्री अपरात्री — कचरा व्यवस्थापन ढासळलेले
शेख यांचे मत स्पष्टः “ही परिस्थिती शहराने नव्हे तर नाकर्त्या सत्ताधाऱ्यांनी निर्माण केली आहे. आज तेच लोक हात जोडून मताची भीक मागत आहेत आणि ‘शहराचा कायापालट करू’ म्हणत आहेत. हे आश्वासन नसून निखळ मगरमच्छी अश्रू आहेत.”
“खोटं वाटत असेल तर जाहीर व्यासपीठावर बसू” – शेख यांचे आव्हान
आपल्या आरोपांचे पुरावे आणि कागदपत्रे असल्याचा दावा करत शेख यांनी स्पष्ट आव्हान दिले— “ज्यांना माझे आरोप खोटे वाटतात त्यांनी जाहीर व्यासपीठावर समोरासमोर बसावे. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी करुया.”