दौंड मध्ये  स्वप्नील शहा यांनी भाजपा सोडला ,निवडुकीत कमळ गायब!?

आवाज लोकशाहीचा विजय चव्हाण…

भाजपाचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी पक्ष सोडून आज नेमके एक महिना एक दिवस होतोय. आणि या  काळात भाजपची दौंडमधील अवस्था अक्षरशः कोसळल्याचे चित्र नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसले — कमळ चिन्हावर एकही उमेदवार पक्षाला उभा करता आला नाही.
मागील निवडणुकीत पक्ष सत्तेत नसतानाही स्थानिक कार्यकर्त्यांनी जिद्दीने चिन्हावर निवडणूक लढवली होती. पण आज राज्यात मुख्यमंत्रीपद असताना देखील दौंडमध्ये उमेदवार तयार झाला नाही, ही पक्षाच्या संघटनशक्तीची ओस पडलेली बाजूच दाखवणारी घटना ठरली.
शहा यांच्या जाण्याने झालेले नुकसान उघड झाले ?
जुन्या टीममधील शहा, ताकवणे, फडतरे यांची निर्गमन, तर काळे, डाबी, शर्मा यांची  कमालीची शांतता  दिसत आहे ,यामुळे भाजपचा शहरातील कणा तुटल्याचे चित्र स्पष्ट आहे. शहा गेले तरी काही फरक पडत नाही, असे म्हटले गेले होते; पण प्रत्यक्षात त्यांची उणीव भाजपला चांगलीच जाणवत आहे.
आमदार राहुल कुल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शहरात लोक चर्चेतून सांगतात— नागरी हित संरक्षण मंडळाला आमदार कुल यांची साथ आहे, आणि त्यामुळेच भाजपने शहरात कमळ चिन्ह न वापरता निवडणूक टाळली.
या चर्चेला थोडाफार आधार म्हणजे नवीन भाजप पदाधिकाऱ्यांची शहरात ओळख नसणे, आणि जुन्या कार्यकर्त्यांचा पूर्ण निष्क्रीयपणा.आहे असे म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही.
पक्षाचे अस्तित्वच  अशा प्रकारच्या प्रश्नात रुतलेल दिसत आहे
आज नागरिक विचारतात — “दौंडमध्ये भाजप आहे तरी कुठे?” शहरातली ही अवस्था ग्रामीण भागातही परिणाम करणार ?  अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये आहे.आणि हे टाळण्यासाठी जाहीर प्रकटन पक्ष्याला देणे काळाची गरज आहे.
भाजपने कमळ चिन्हावर उमेदवार का न उभा केला? ही रणनीती कोणत्या कारभाराला पक्ष म्हणून साजेशी आहे की पूर्ण अपयश म्हणावे अशी वादळी चर्चा शहरात सुरू झालेली आहे

कुल मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकट वर्तीय आहेत जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी यथोचित प्रयत्न करतात असे असताना त्यांच्या मतदारसंघात त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवता येत नाही ?अशी शंका जोर धरत आहे तिचा बीमोड करण्यासाठी
याचा खुलासा आमदार कुल किंवा जिल्हा भाजप करत नाहीत तोपर्यंत टीका, चर्चा आणि ताशेरे थांबणार नाहीत.