आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण विशेष वृत्त
दौंड तालुक्यात “गरुडा इन्फ्रा” या कंपनीच्या टेंडर साम्राज्यावर अखेर चौकशीची छाया येऊ लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची मागणी केल्याने प्रशासनातील काहींच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. सुळे यांच्याकडे “गरुडा” संदर्भातील इतंभूत माहिती आणि दस्तऐवज आवाज लोकशाहीकडून सादर केली जाणार असून, आता या चौकशीमुळे अधिकाऱ्यांचा कारभार उघडकीस येण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.
तालुक्यातील १८७ ठेकेदारांनी दबक्या आवाजात “गरुडाच्या टेंडरसाठी नियम पायदळी तुडवले गेले” असा आरोप सुरू केला असून, त्यांच्या गप्प आवाजातून भीतीची सावली स्पष्ट दिसते. “गरुडाच्या विरोधात गेल्यास मोठी किंमत मोजावी लागेल” अशी भीती ठेकेदारांमध्ये पसरली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की — गरुडाच्या पाठीशी नेमकं कोणाचं राजकीय संरक्षण आहे?
दरम्यान, ५० कोटींच्या क्लब टेंडरच्या डावात तीन भागीदार एकत्र येऊन काम मिळवले, असा आरोपही पुढे येतोय. तालुक्यात या “त्रिकुट युती”मागे कोणाचा आशीर्वाद आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या समर्थ असणारे हे तिघे एकत्र का आले? हा प्रश्न ठेकेदार, अधिकारी आणि स्थानिक जनतेत खळबळ माजवतो आहे.
विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत केवळ तीन वर्षांत कंपनी स्थापन करणारे आणि राज्य बँकेत अडीच कोटींची अनामत ठेवणारे भागीदार आता या संशयास्पद डावात कसे सामील झाले, याचे रहस्य गहिरे आहे. या सर्व घटनाक्रमामागे कोणाचं सूत्रबद्ध नियोजन आहे, हे शोधणे गरजेचे आहे.
खासदार सुप्रिया सुळे जर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करतील, तर गरुडा इन्फ्राच्या साम्राज्यामागचं पितळ उघड होईल, असा जनतेत विश्वास निर्माण होतो आहे.
“गरुडाच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचाराचा वास येतो…
आणि त्या वासानेच आता दौंडच्या प्रशासनाला चक्कर येऊ लागली आहे वाईट परिणाम एकच होतोय १८७ठेकदार गुलामगिरीच्या वाटेवर निघालेले असताना त्यांच्यावर आवाज कार्याचा नाही तोंड बंद ठेवायचे अशी दहशत केली गेली आहे



