दौंड प्रतिनिधी | आवाज लोकशाहीचा
तालुक्यात १० आणि २५ कोटींचा रस्ता गेली कित्तेक वर्ष झाला नाही ,की केला नाही ?हा प्रश्न निर्माण झालेला आहे वाखारी आणि पिंपळगाव यवत रस्त्यावरील फलकाकडे पाहिल्यावर हा प्रश्न निर्माण होतो आहे पिंपळगावरून यवत कडे येताना कामाचा फलक नातू वस्तीजवळ उभा केलेला आहे .मात्र काम सुरू आणि संपवण्याचा विषय त्यात लिहिला नाहीं.तोच प्रकार वखारी खोर रस्त्यावर लावलेला फलक शंका उपस्थित करीत आहेअधिकाऱ्यांना विचारले असता पहावे लागले माहिती घेतो असे सांगत असून ठेकदराचे बोलणे नवलाईचे वाटू लागले आहे .तुम्ही म्हणाला तर टाकतो काम सुरू आहे अर्धे केलेले आहे काम अडविलेले आहे त्याच्या या माहितीत अनेक नवलाईचे विषय आहेतविकासाच्या नावावर कोट्यवधींच्या निधीची कामे सुरू असताना त्यामागे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जुगलबंदी असल्याचे नागरिकांचे आरोप गंभीर स्वरूप धारण करत आहेत.अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये सामान्यांना माहिती मिळत नाही, तर ठेकेदारांच्या वातानुकूल वाहनांमधून हेच अधिकारी विकासाची चव चाखताना दिसतात, असा लोकांचा सूर आहे.
तालुक्यातील अनेक रस्ते, इमारती आणि सार्वजनिक सुविधा कामांमध्ये दर्जेदारपणाचा फज्जा उडाल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. “हे विकास नव्हे, हा निधी गिळंकृत करण्याचा खेळ आहे,” असे जळजळीत भाष्य स्थानिकांनी केले आहे.

गेल्या पंधरा वर्षात बांधकाम उपविभागाच्या माध्यमातून झालेल्या कामांची गुणवत्ता आणि खर्च तपासला गेल्यास, हा विभाग आणि त्याच्याशी संलग्न ठेकेदारांनी तालुक्याला आर्थिक चराऊ कुरण मानले आहे,असाच रस्ता खोर वाखारी मुख्यमंत्री सडक योजनेतील केला गेला आहे रस्त्यावर कोणत्या शासनाच्या माणसाने भेट दिली निरीक्षण केले हा मोठा संशोधनाचा भाग आहे. वाखारी गावाकडून झालेला रस्ता गझला फॉर्म पासून अरुंद करण्यात आला आहे त्याची रुंदी जसेजसे पुढे जावे तशी कमी केली आहे गेली दहा वर्ष हा रस्ता ठेकदरा आणि अधिकारी यांच्या जुगलबंदी सुरू झाला असून तो अद्याप सुद्धा संपलेला नाही उलट संपणे अगोदरच त्याची अवस्था प्रचंड खराब झालेली आहे या रस्त्यावर २५ कोटी रुपयांचा खर्च दाखवला असून रस्ता पाच कोटींचं रुपयांचा केला गेला आहे असा अंदाज नागरिकांकडून केला जातो आहे

दौंड शहरातील सुरू असलेल्या क्रीडांगणाच्या कामासाठी किती निधी खर्च केला जातोय? हे काम केव्हा सुरू झाले आणि केव्हा पूर्ण होणार? याबाबत सुद्धा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडून ठोस माहिती दिली जात नाही. माहिती केवळ ‘लाभार्थी’ आणि ‘विश्वासू कार्यकर्ते’ यांच्यापुरती मर्यादित ठेवली जात असल्याचा आरोप आहे.बांधकाम उपविभागात काम करणारे अधिकारी फिरतीवर असल्याच्या नावाखाली कायम अनुपस्थित असतात. ते गावागावांत ठेकेदारांच्या गाडीतून फिरताना दिसतात, अशीही थेट तक्रार आहे. अनेक ठिकाणी कामांची माहिती देणारे फलक जनतेच्या नजरेपासून दूर, अडगळीच्या जागी लावण्यात आले आहेत.
तालुक्यातील एक प्रमुख अधिकारी पत्रकार आणि ठेकेदारांच्या सहवासात रात्रंदिवस फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावोगावी या अधिकाऱ्याने स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्याकडून कोणतीही माहिती सामान्य नागरिकांना मिळत नाही. उलट ही माहिती कशी लपवता येईल, याकडेच अधिक लक्ष असल्याचे बोलले जाते.या सर्व कारभारामागे राजकीय आशीर्वादाचा भाग असल्याचा आरोप करत, तालुक्यात हजारो कोटींचा निधी खर्ची घालूनही कामांची गुणवत्ता ढासळलेली आहे. तक्रार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून अधिकारी आणि ठेकेदारांचे हे नेटवर्क आजही बिनधास्तपणे कार्यरत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.



