आवाज लोकशाहीचा
यवत प्रतिनिधी | दि. ३१ जुलै २०
यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने गेल्या चार दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २६ जुलै रोजी झालेल्या या कृत्यात मुस्लिम व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे गावात हिंदू-मुस्लिम तणाव अधिकच वाढला.
संतप्त हिंदू बांधवांनी सकल हिंदू संघटनांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन उभं केलेले होते ,या साठी दरम्यानच्या काळात दोन निषेधसभा झाल्या होत्या,
यामध्ये मुस्लिम समाजावर थेट आरोप करत त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांच्या मशिदींच्या वाढत्या संख्येपासून ते मदरशांमधील शिकवणीपर्यंत अनेक मुद्द्यांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या .
या दरम्यान, यवत पोलिसांनी आरोपी अमित पापा सय्यद (वय ३५, रा. चोबे वस्ती) आणि रेड्डी कावरा गुडदावत (वय ३९, रा. येवत रेल्वे स्टेशन जवळ) या दोघांना अटक केली आहे.
या पैकी अमित मूळ आरोपी असून गुडदावत हा गावठी दारू विक्रेता आहे पोलिसांनी गुडदावत याला अमितला दारू दिली आणि पोलिसांना दुसऱ्या दिवशी माहिती दिली नाही म्हणून सहा आरोपी केलेले आहे चार दिवस पोलिसांच्या हाताबाहेर गेलेले प्रकरण असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला होतव.गावात अनेक हिंदू संघटनांनी शिरकावा करून प्रकरणाची गंभीर दहशत निर्माण केलेली होती .आम्ही छत्रपतींच्या दृष्टकृत्यासाठी आलो आहोत अशी महाराजांच्या विषयी आत्मियता सांगत प्रकाराला मोठे गंभीर वळणं दिले होते .
याचा परिणाम नुसत्या यवत गावावर झालेला न्हवता त्याचे लोण तालुक्यात जिल्ह्यात आणिं राज्य भर गेले होते सोशल मीडियाने या बाबत मुस्लिम समाजाबाबत आग ओकलेली होती दौंड तालुका या निमित्त एक दिवसाचा बंद पुकारला गेला होता
गावात यानिमित रविवारी दिनांक ३१ जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, तसेच वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्गुरु स्वामी हेमांगी सखी प्रमुख उपस्थित होत्या.
सभेतून छत्रपतींच्या विटंबनेचा तीव्र निषेध करत ‘धर्म रक्षणासाठी एकरूप व्हा’ असा संदेश देण्यात आला. गोपीचंद पडळकर यांनी भावनिक भाषणात शाहिस्तेखान व अफजलखानाची उदाहरणे देत “हिंदू धर्म म्हणजे एक मोठी इमारत असून जातीपाती म्हणजे तिच्यातील खोल्या आहेत, पण धर्म हा एकच”असे सांगून सर्व अन्य समाज हिंदुच आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला

स्वामी हेमांगी सखी यांनी जिहादी मानसिकतेचा तीव्र निषेध करत, “धर्मावर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही,” असा इशारा देऊन म्हणाल्या आम्ही किन्नर या पुढे धर्म रक्षणासाठी तुमच्या पुढे एक पाऊल असू धर्मासाठी सर्वांनी एक जुटीने राहिले पाहिजे यावेळी ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत सभास्थळी उत्स्फूर्त ललकार दिल्या गेल्या.
गावात निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस व यवतचे पोलीस निरीक्षक नारायणराव देशमुख यांनी शांततेत हाताळल्याने संतप्त झालेल्या चार दिवसाची यवत गावची परिस्थिती उत्तम रित्या हाताळल्याने कोणताही अघटीत प्रकार घडला नाही
गावात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जातीय तणाव निर्माण झाला आहे. गावातील तरुण, महिला आणि विविध स्तरांतील नागरिकांनी सभेत सहभाग घेतला. यापुढील काळात गावात शांतता प्रस्थापित होईल की आणखी वाद उद्भवतील, हे गेली चार दिवसांच्या परिस्थितीचा अंदाज लावून सांगता येणार नाहीन्या ठिकाणी गावात चांगल्यापैकी मुस्लिम समाज असून मूळचा आणि बाहेरून आलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आगामी काळात गावात हिंदू मुस्लिम तिढा सुटणार का ? हा प्रश्न मोठा गहन झालेला आहे

भांडगाव या ठिकाणी यांचे पडसाद उमटले आहेत नमाज पठण करण्याची एक बंदिस्त खोली तोडली गेली आहे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते गावठाणात अतिक्रमण करून हा प्रकार केल्याचे सध्या बोलले जात असून या बाबत मुस्लिम ,गावकरी,आणि पोलिस यांची कोणतीच प्रतिक्रिया मिळालेली नाही




