यवत प्रतिनिधी | आवाज लोकशाहीचा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर यवत गावात निर्माण झालेला असंतोष अद्याप शमलेला नसून, आज यवत ग्रामपंचायतीच्या वतीने झालेल्या विशेष ग्रामसभेत या संतापाचा तीव्र उद्रेक झाला. सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत धार्मिक अस्मिता, प्रशासनातील दुर्लक्ष, आणि गावात वाढत चाललेल्या अनधिकृत हालचाली यावर ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला.
ग्रामसभेची सुरुवात निळकंठेश्वर मंदिर परिसरातील शिवमूर्ती विटंबनेच्या निषेधाने झाली. त्यानंतर चर्चेने वळण घेतले अनधिकृत रहिवास, प्लॉटिंग, मस्जिदीवरील स्पीकर वापर, उर्दू शिक्षण व मराठी भाषेच्या वापरावर.
बाहेरून आलेल्या अनधिकृत रहिवाशांना कागदपत्रे कशी मिळतात?
धनगरवाडा परिसरात विशिष्ट समाजासाठी १३ एकर जागेची विक्री कशी असा प्रश्न सुधा यावेळी उपस्थित करताना
स्पीकरवर बंदी असतानाही मशिदींमध्ये आवाज कसा सुरू?आहे याची सुद्धा मोठी वादळी चर्चा झाली याच बरोबर उर्दू माध्यमातून शिकवणाऱ्या शाळांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक करावा.असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे या बरोबर
१२०० स्क्वेअर फुटांच्या जागेवर ३००० फुटांचे बांधकाम झाले कसे झाले ते हटवण्यात यावे अशी चर्चा केली गेली
पुढील आठ दिवसांत पोलीस, महसूल विभाग व ग्रामपंचायत संयुक्त सर्वे करून अनधिकृत रहिवाशांवर कारवाई अशी सर्वांमुख मागणीं करण्यता आली आहे
तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्लॉटिंग व नोंदींची तपासणी.हा प्रश्न उपस्थित केला गेला
पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोपीचा शोध ड्रोनच्या साहाय्याने सुरू असल्याचे सांगून शांततेचे आवाहन केले. पीएमआरडीएचे अधिकारी शशी भूषण होले यांनी लवकरच वरिष्ठांकडे अहवाल सादर करून कारवाईचे आश्वासन दिले. तलाठी महेश मेटे यांनी नोंद तपासून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचे सांगितले.
ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक गावातील धान्य बाजारात उभारण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
ग्रामस्थांच्या संतप्त भावना, धार्मिक अस्मितेचा मुद्दा, आणि स्थानिक प्रशासनाचे संभाव्य अॅक्शन प्लॅन यामुळे यवत गाव पुन्हा एकदा राजकीय-सामाजिक चर्चेचे केंद्र बनले आहे.
शिवमूर्ती विटंबना: यवत ग्रामसभा संतापली!”
अनधिकृत रहिवासी, मस्जिदींचा मुद्दा, आणि शिवस्मारकाचा ठराव या विषयाची वादळी चर्चा केली गेली प्रथमच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते



