दौंड मध्ये भाजपा मध्ये पडणार खिंडार अनेक कार्यकर्ते करणार अखेरचा रामराम!आमदार कुल यांना धक्का!

आवाज लोकशाहीचा

प्रतिनिधी | दौंड | विशेष राजकीय बातमी

दौंड तालुक्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याविषयी वादळी चर्चा रंगली आहे. पक्षवाढीसाठी जिल्ह्याबाहेरील नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात आघाडी घेतलेल्या कुल यांना, आपल्या मतदारसंघात पक्ष सांभाळणे कठीण जात आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे,या प्रकरणाने आमदार कुल यांच्या तालुक्यातील राजकारणा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होते आहे

तालुक्यातील दोन पिढ्या भाजपच्या कार्यात वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेक पदाधिकारी आणि कट्टर समर्थकांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
दौंड शहरासह पारगाव, कासुर्डी, कुसेगाव, पाटस, वरवंड, चौफुला, यवत या भागांतील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.

कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले – “पक्षप्रवेश होईपर्यंत आम्ही कोणतेही वक्तव्य करणार नाही, ना नावे उघड करणार आहोत.”
यामागे आमदार कुल यांच्याकडून वरिष्ठांकडून दबाव टाकण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

याच दरम्यान, कोणत्या पक्षात प्रवेश करणार, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे –
उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, शरद पवार, अजित पवार की काँग्रेस…?
नावे उघड नाहीत, पण घडामोडी वेग घेत आहेत.

ज्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी तनमनधन अर्पण केले, तेच आज बाजूला पडले गेलेत.
अनेकांनी आरोप केला आहे की – “कुल हे पक्षात बाहेरून नेते आणून प्रसिद्धी मिळवत आहेत, पण आपले जुने कार्यकर्तेच उपेक्षित आहेत.”

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, इंदापूरचे प्रवीण माने यांना पक्षात आणण्यासाठी खुद्द कुल यांनीच भूमिका बजावली. मात्र, हे करत असताना दौंडच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची पाठीमागे होणारी उपेक्षा, त्रास आणि अन्याय ही बाब पक्षासाठी मोठा धक्का ठरू शकते.

घरचा आहेर भाजपला – आणि खिंडार पक्षात!”

तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी हे केवळ व्यक्तिसापेक्ष नाही, तर संपूर्ण पक्षसंघटनेच्या अस्थिरतेचं लक्षण आहे.