दौंड च्या मूलभूत प्रश्नांचा चिखल झाला असताना आमदारा राहुल कुल हवेली तालुक्यांच्या प्रश्नासाठी उत्साही का?!*”विरोधकांचा खोचक सवाल*”

आवाज. लोकशाहीचा….दौंड प्रतिनिधी

तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली तीस वर्षात सुटला नाही मात्र करोडो रुपये त्याच्यावर खर्च झाले आहेत .तालुक्याचा सोडा आमदार राहतात त्या स्वतःच्या गावात आज गेली अनेक वर्ष पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते आहे,
तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह अनेक विकास कामाचा खर्चाचा आकडा कोट्यवधीन मध्ये झाल्याचे दौंड मधील आमदार आणि त्याचे प्रामाणिक कार्यकर्ते प्रचार आणिं प्रसार करून बसले आहेत ,काही आज ही करीत आहेत .मात्र पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्ना बरोबर अनेक सामाजिक कामांचा प्रश्न बाकी असताना कुल यांना जिल्ह्याच्या प्रश्नाची काळजी आहे ?असा खोचक टोला तालुक्यातील विरोधक मरताना दिसत आहेत.

नुकताच कुल यांचा विधिमंडळातील कामकाजाचा व्हिडिओ समर्थकांनी व्हायरल केला आहे .काही .सोशल मिडिया प्रिंट मिडिया आणि वर्तमानपत्रातून सुद्धा हा विषय प्रकाशित झालेला आहे .बातमी स्वरूपाचा विषय असल्याने त्यांनी त्यांची भूमिका बजावलेली आहे .या मुळे विरोधक टीका टिप्पणी करू लागले आहेत.
दौंड शहरातील गटारीच्या पाण्यातील प्रकरण कचरा प्रकरण कत्तल खाना, फिश मार्केट शहरात बुद्ध विहाराच्या अपूर्ण बांधकामाचा प्रकार गेली काही वर्ष कासव गतीने चालवलेले क्रीडांगणाचा कारभार या पेक्षा भयानक नदीपात्रातील पुलाचे कोसळलेले खांब

हे विषय सोडवण्यासाठी आमदारा साहेबाना वेळ मिळत नाही .अशी टीका ते करू लागले आहेत

! ज्यांची होते मदत त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न कुल करतात का?!


कुल यांच्या घराण्याला राजकीय वसा त्यांच्या आजोबांचा आहे असे ते नेहमी सांगता मात्र तालुक्याच्या आमदारा होण्यासाठी त्यांचे स्वर्गीय वडील लोकनेते सुभाष कुल यांच्या साठी सध्याचे माजी आमदारा आणि जिल्हा बँकेचे ज्येष्ठ नेते रमेश थोरात यांची मोलाची साथ मिळालेली होती घोडा चिन्हाचा राजकीय प्रवास त्यावेळी थोरात यांनी बारामतीच्या राजकारणाला विरोध करून लक्षवेधी करण्यासाठी यथोचित प्रयत्न केले होते. त्यातून तत्कालीन दौंडला पहिल्यांदा राहू बेटात आमदार पद मिळाले पाच वर्ष अपवाद सोडता सलग हे पद त्याचा घरात आहे .
त्याच गावच्या पिण्याच्या पाण्यावर कोटी रुपयांचा खर्च झालेला असताना आज प्रत्येक नागरिक विकत पिण्याचे पाणी घेतोय ही बाबा मोठी गंभीर आहे .
रमेश थोरात कुल यांना कट्टर राजकीय वैरी वाटत आहेत .त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी विद्यमान आमदारा आणि त्यांच्या मातोश्री रंजना कुल यांच्या राजकारणाने मोठे अथक परिश्रम घेतले आहेत
लोकमताचा चाहता असलेला रमेश थोरात मात्र कुल यांच्या डावपेचांची शिकार होऊ शकले नाहीत ,उलट सद्य परिस्थिती कुल यांच्या राजकीय सार्वभौम मजबुतीला थोरात भक्कम पने लढा देत आहेत.

ज्यांच्यामुळे कुल यांची राजकीय बाजू मजबूत झाली त्या बारामतीकरांना सुद्धा कूल यांनी सोडून सत्ता परिवर्तनाच्या कालखंडात धनगर समाजाचे महादेव जानकर यांची मदत घेऊन आमदारकी मिळवली त्यांनाही धोका देत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे,

कुल यांनी देशाला दिशा देणाऱ्या बारामतीकरांच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी  पवार यांच्याच मुली विरोधात पत्नी कांचन कुल यांना निवडणुकीमध्ये उभे केले मोठी राजकीय ताकद पाठीशी असतांनाही खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करताना नाही.याचा सल मनात ठेऊन त्यांनी

सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक मातब्बर राजकारण्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केलेलं आहेत त्या विषयाच्या बातम्या वर्तमान पत्रातून आलेल्या आहेत.
भोरचे संग्राम थोपटे इंदापूरचे प्रवीण माने आणि पुरंदरच्या माजी आमदार संजय जगताप यांचा नाम उल्लेख केल्यास चुकीचे ठरणार नाही.
भाजपच्या सानिध्यात कुल यांची मोठी किंमत आहे असा समज सर्वदूर झाला असला तरी कुल यांना भाजपाने दोन वेळा आश्वासन देऊन फसवल आहे हे त्यांच्या कसे लक्षात येत नाही अशी लक्षवेध कुल आणि भाजपा प्रकरणे करताना दिसत आहेत.
कुल मंत्री होणार हा देवेंद्राचा शब्द अद्याप पूर्ण झालेला नाही
.ज्यांची कुल परिवाराला राजकीय मदत झाली त्यांच्याच विरोधात कुल सध्या डावपेच करीत असल्याने कुल मदत करणाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात असा आरोप विरोधकांचा आहे ,


.
!हवेली ची ओढ कुलं यांना जास्त का?!


सध्या पुणे परिसरातील हवेतील नागरी सुविधांचा प्रश्न कुल पोटतिडकीने मांडताना दिसले आहेत त्या साठी विधिमंडळात त्यांचे उद्रेक शब्द मीडियातून सर्वश्रुत झाले आहेत .
तालुक्यातील सामाजिक प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असताना कुल यांना हवेलीचा ओढ कश्यामुळे असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांकडून आगामी काळात कुल राहत असलेल्या राहू परिसरातील गावांचा समावेश हवेली तालुक्यात होण्याची शक्यता आहे आणि आपण आगामी काळात नेतृत्व करू शकू या स्वप्नाने कुल हवेलीच्या प्रश्न सोडवण्यासाठी ताकद खर्ची करू लागले आहेत अशी भविष्य वाणी सुधा करतांना दिसत आहेत .