भ्याड हत्येचा उलगडा! यवत पोलिसांची खाकी पुन्हा एकदा बोलकी!
केडगाव प्रतिनिधी | आवाज लोकशाहीचा
भुलेश्वर पायथ्याशी २७ जून रोजी सापडलेल्या अज्ञात, अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या भीषण प्रकरणाचा गुन्हेगारी उलगडा यवत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत करून दाखवला आहे.
खून झालेल्या व्यक्तीची ओळख लखन किसनराव सलगर (वय २४, रा. टाकळी ढोकी, ता. जि. धाराशिव) अशी पटली आहे. या खुनाप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटकेत असलेले आरोपी:
योगेश दादा पडळकर (२५)
राजश्री योगेश पडळकर (२३) – दोघेही रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे
विकास आश्रुबा कोरडे (२१), रा. आनंदवाडी टाकळी ढोक
शुभम उमेश वाघमोडे (२२), रा. मुरुड, ता. लातूर
काकासाहेब कालिदास मोटे (४२), रा. येवती, धाराशिव
गुन्ह्याची पार्श्वभूमी:
२२ जून रोजी सकाळी ९ वाजता यवत पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की भुलेश्वर पायथ्याशी एक जळालेलं, अज्ञात मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी तपास करताना मृताच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार आणि पेटवून देण्याचे स्पष्ट पुरावे आढळले.
शवाची ओळख पटत नव्हती, त्यामुळे पोलीस हवालदार विनायक हाके यांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.
तपासात यश मिळवणारे अधिकारी:
या गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंहगिल यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, दौंड विभागाचे पोलीस अधिकारी बापूराव दडस, पुणे विभागाचे अधिकारी अविनाश शेळीकर, यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी समन्वयाने आणि धाडसी कारवाई करत गुन्हेगारांचा माग काढला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, पो.उ.नि. मारुती मेतलवाड, सचिन घाडगे, मोमीन शेख, अजित भुजबळ, अजय घुले, धीरज जाधव, स्वप्नाली टिळवे यांच्यासह तब्बल ३५ हून अधिक पोलिसांनी अत्यंत चिकाटीने तपास करून ही कामगिरी केली.
“गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी पोलिसांच्या सतर्कतेपासून सुटू शकत नाही” हे पुन्हा सिद्ध झालं आहे.
“कानून के हाथ लंबे होते हैं” हा डायलॉग इथे प्रत्यक्षात उतरला आहे. यवत पोलिसांनी केलेली ही कामगिरी प्रशंसनीय असून खाकीचा विश्वास अधिक बळकट करणारी ठरली आहे



