रिच ट्रस्ट’ बनली गरजूंचा आधारस्तंभ; जितेंद्र मोहन यांची प्रेरणादायी सामाजिक चळवळ


पुण्यातील गरिबांसाठी वर्षानुवर्षे कार्यरत; शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि प्रकाशयोजनांमध्ये मोलाचा वाटा


आवाज लोकशाहीचा

पुणे प्रतिनिधी …. एकीकडे समाजामध्ये स्वार्थ आणि उपकाराची अपेक्षा वाढत असताना, ‘रिच ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेने गरिबांसाठी आशेचा किरण ठरवत आपली स्वतःची सामाजिक दिशा निश्चित केली आहे. जितेंद्र मोहन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे पुणे शहर आणि परिसरात गरजू, पीडित आणि दुर्बल घटकांसाठी अथक सेवा कार्य चालवले आहे.

शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत आणि वीज योजनेपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये ट्रस्टने मोलाची कामगिरी बजावली आहे. सोलापूर महामार्ग, अहिल्यानगर आणि पुणे शहरातील अनेक शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि भावनिक पाठबळ देत ही संस्था त्यांचं खंबीर आधारस्थान बनली आहे.

💡 ‘अंधारातून प्रकाशाकडे’: एक खऱ्या अर्थाने समाजसेवेचा संकल्प

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षं वीजवंचित असलेल्या मावळ प्रांतातील गावांमध्ये ‘रिच ट्रस्ट’ने वीज पुरवठा करून प्रकाश दिला. या कार्यामुळे त्या भागातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. “अंधारातून प्रकाशाकडे चला” हा त्यांचा संकल्प केवळ घोषवाक्य न राहता, प्रत्यक्ष कृतीतून जगासमोर ठेवलेली प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

👩‍👧 महिला सक्षमीकरणातही पुढाकार:

महिलांना स्वयंनिर्भर बनवण्यासाठी ट्रस्टचे विशेष उपक्रम राबवले जात आहेत. महिला बचतगट, कौशल्यविकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून ‘रिच ट्रस्ट’ने त्यांच्या जीवनात नवसंजीवनी दिली आहे.

🙏 नागरिकांना आवाहन:

या निमित्ताने जितेंद्र मोहन यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “रिच ट्रस्टचं कार्य पहा, समजा आणि तुमच्या कुवतीनुसार त्यात सहभाग घ्या. आज गरजवंतांसाठी तुमचा छोटासा हात उद्याचं भविष्य उजळवू शकतो.”