दौंड तालुक्यातील केडगावमध्ये दुर्दैवी घटना — भांडणाच्या दरम्यान त्रिशूळ फेकल्याने अकरा महिन्याच्या चिमुकल्याच्या डोक्यात घुसला


आवाज लोकशाहीचा ..
केडगाव (ता. दौंड), दि. १० जुलै —
गुरुपौर्णिमेच्या दिवशी केडगाव गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास नवरा बायकोच्या  सुरू असलेल्या भांडणाचा परिणाम एका निष्पाप अकरा महिन्याच्या बालकाच्या जीवावर बेतला.
अवधूत सचिन मेंगावडे हा ११ महिन्याचा निष्पाप बालक ठार झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की नितीन अजिनाथ मेंगावडे वय ४१ आणि त्याची पत्नी पल्लवी यांच्यामध्ये गुरुपौर्णिमा दिनांक दहा जुलै रोजी घरी सकाळी साडेदहाच्या सुमारास भांडण सुरू होते. भांडणाचा आवाज कानावर आल्याने शेजारीच असलेली नितीन याच्या भावाची पत्नी भाग्यश्री सचिन मेंगावडे हिने कडेवर असलेल्या अवधूतला घेऊन भांडण सुरू असलेल्या नितीन पल्लवी कडे आली होती बराच वेळ या दोघांचा तंटा मिटण्या ऐवजी वाढत गेला देवघरात असलेला त्रिशूल पल्लवीने रागाच्या भरात नितीनच्या दिशेने भिरकवला होता  नितीन ला सोडून तो भाग्यश्री च्या कडेवर असलेल्या चिमुकल्या अवधूतच्या डोक्यात घुसला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता त्याला उपचारा खातर केडगाव परिसरात असणाऱ्या दवाखान्यामध्ये नेण्यात आले होते मात्र अवधूत ची अवस्था पाहून त्याचा उपचार करणे अवघड असल्याने केडगाव मधून त्याला लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते .
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित आरोपी महिला पल्लवी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी अनेक ग्रामस्थ जमले असून या धक्कादायक घटनेमुळे गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण आहे.

                         विशेष
नितीन हा व्यसनी असल्याने पल्लवी आणि त्याची रोज भांडणे होत होती अशी माहिती मिळाली आहे .घरात देव्हारा आणि त्यात त्रिशूळ असल्याने पल्लवी देवभक्त आहे असे चित्र स्पष्ट होते आहे एका बाजूला पती व्यसनी आणि पत्नी देवभोळी असा परिवार आहे मात्र व्यसनाने आणि भक्तीने वाद केला आणि एका निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागला तेही गुरुपौर्णिमे दिनी या प्रकरणाचा समाजाने बोध घेतला पाहिजे,व्यसनाने हद्द पार केली की श्रद्धेचा सुद्धा सीमा ओलांडून जाते आणि त्यातून काहीतरी अघटीत घडते .
याचा विचार समाजातील प्रत्येक व्यसनी व्यक्ती आणि श्रद्धेचा आदर असणाऱ्या महिला पुरुषांनी  केला.पाहिजे अशी आशा बाळगल्यास चुकीचे ठरणार नाही