दौंड: आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी: विजय चव्हाण
कचऱ्याचा ढीग, त्यावर मोकाट जनावरे, गटारीच्या पाण्याचा उपद्रव आणि त्यातून सुटका मिळावी म्हणून त्याचा घाणीच्या पाण्यात करावे लागलेले आंदोलन अशा विविध समस्यांनी गालबोट लागत असलेल्या दौंड नगरपालिकेच्या कारभाराला नागरिक वैतागलेला आहे. त्रासा पोटी कुठ नेऊन ठेवले दौंडला असा सूर काढू लागलेला आहे.
गेली पाच वर्षात नगर परिषदेसाठी मुख्यकार्यकारी म्हणून १३ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा हातभार लागला मात्र ऐकला सुद्धा कार्यकाला पूर्ण करता आलेला नाही, सध्या आलेले अधिकारी अवधूत तायडे हे सुद्धा कल्याण डोंबवली महानगर पालिकेच्या दीड लाख रुपयांच्या लाच प्रकरणी वादग्रथ ठरलेले आहेत. आता यांच्या कडून काय होणार रे बाबा अशी चिंता तायडे यांच्या आगमनाकडे पाहून व्यक्त करू लागले आहेत.

दौंड शहराच्या मूलभूत विकासातील घनकचरा आणि सांडपाण्याचा निचरा यावरच परिषदेच्या माध्यमातून मोठा गोंधळ झाला आहे. सांडपाण्याच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचा पाण्यात बसून झालेले आंदोलन सर्वश्रूत झाले आहे. कचऱ्याच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी न्यायालयाच्या दरात जावे लागले आहे. याची खबर प्रशासनाच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गासह जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी, लोक प्रतिनिधींना सुद्धा समजलेली आहे. मार्ग काढण्याचा बराच प्रयत्न केला गेला असताना कोणत्या तरी पालिकेत लुडबूड करणाऱ्या अतृप्त आत्म्याला त्याची अडचण झालेली असल्याने निघाला नाही अशी ओरड शहरात सर्वदूर पसरलेली असताना उघडपणे बोलणे टाळून दबक्या आवाजात याची वाच्यता केली जाते आहे.
परिणामी एप्रिल महिन्यात कचरा व्यवस्थापनाचे निघालेले टेंडर जून महिन्यातही पुढे प्रवास करू शकले नाही .आणि त्याचा पुढचा प्रवास होण्यासाठी टेंडर भरलेल्या कंपनीने सरळ उच्च न्यायालयात धाव घेऊन हा विषय लक्षवेधी केला. गटारीच्या आंदोलनात आंदोलन झालेल्या परिसरात तत्काळ लक्ष घालून प्रशासनाने काम केले होते. विषय म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उणीव असताना हे काम केले गेले कोणी केले कोणाचा आदेश झाला हा शोधमोहिमेचा भाग असला तरी शहरात अन्य परिसरातील हीच अवस्था मात्र अद्याप कोणीतरी आदेश देईल आणि काम केले जाईल या परीक्षेत आहे, विशेष करून पानसरे वस्तीत या बाबत नागरिकांची ओरड झालेली आहे.
कचऱ्याच्या ठेक्याचा हक्कदार कोण होणार याचा निर्णय न्यायालयातून होण्याचे लक्षणे असली तरी कचऱ्यात लुडबुड कोण करते याचा तपशील कोण उघडा करेल का? असा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे.
१४ वे अधिकाऱ्यांची परिषदेतील पहिली एन्ट्री आंदोलन करत्याच्या दर्शनाने
वादग्रस्त ठरलेले तायडे यांची पाऊले परिषदेच्या इमारतीच्या पायरीला लागण्या अगोदरच विनायक माने या आर टी आय कार्यकर्त्यांच आंदोलन त्यांच्या साठी आव्हान म्हणावे लागले. अगोदरच दीड लाखाच्या लाच प्रकरणात वादाचे ठरलेलं तायडे दौडमध्ये वाद वाढवणारा की कमी करणार हा प्रश्न नागरिकांना समजणे अगोदर तायडे यांना आंदोलनाची प्रथम ओळख झाली आहे. कारभार सोपा नाही असा समज त्यांना झाला असला तरी तायडे सुद्धा कल्याण डोंबवली महानगरपालिकेतून वादग्रस्त होऊन आले आहेत. सध्या प्रश्न कोणी सोडणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले असताना कार्यकर्ते नेत्याला कोण काय म्हणण्यास त्याची हायगय केली जाणार नाही म्हणून उर ताणून गप्पा मारताना दिसत असल्याने कुठे नेऊन ठेवणारे दौंड अशी पश्चातापाची भाषा समजूतदार नागरिक बोलताना दिसू लागली आहे.




