आवाज लोकशाहीचा
स्वाभिमानी दौंडकर :- भाग-४
दौंड प्रतिनिधी
दौंड शहरातील नागरी सोयी सुविधांचा खच पडला असताना राजकीय कुरघोडीने मोठा हैदोस घातलेला आहे. गटाच्या राजकारणाने व्यक्तीत दोष पाहून काम करणारे समाजसेवक शहराच्या विकासाला बाजूला ठेवून नेता निष्ठा प्रेमापोटी भलतीच कामे करू लागलेली आहेत.पोहण्यासाठी तलाव बांधलेल्या शहराला पिण्याच्या पाण्याच्यासह सांडपाण्याची व्यवस्था गेली अनेक वर्ष परिपक्व होऊ शकत नाही ही दुर्दैवी बाब असताना स्वाभिमानी दौंडकर म्हणणारे नक्की कोण आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
शहरात मोकाट जनावरे त्यांचे रस्त्यावर पडणारे मलमूत्र प्रवाश्यांना त्रासदायक ठरत असताना त्याच्याकडे पाहिलेले जात नाही हीच जनावरे साठलेल्या कचऱ्याच्या ढीगातील खाद्य खाताना त्यांना होणारा त्रास नागरिक पाहून ही डोळे झाक करीत राजकीय कुरापतीनसाठी जागृती दाखवताना दिसत आहेत.
गेली अनेक वर्ष शहरात पुरेश्या दबावाने पिण्याचे पाणी अद्याप्पने कोणत्याच प्रभागाला आणि नागरिकांना मिळालेले नाही याची काळजी कोणीच केलेली नाही अनेकांनी राजकीय पदे भोगली मात्र यावर कोणत्याच नेत्याला प्रामाणिक पने यशस्वी तोडगा काढता आलेला नाही.हे सर्वश्रुत असताना चांगभल करण्यासाठी निष्ठावंताची लागीन घाई सर्वांना धान्यात येत असतानाही कोणीच काही बोलू शकत नाही.
अनेक अतिक्रमण धारक सर्व सामान्यांना डावलून ताठ मानेने व्यवसाय करीत असून गोरगरिबांच्या टपऱ्या मधील व्यवसायाला पडण्याचे पातक केले आहे. व्यापारी वर्ग राजकीय कुरघोडीला वैतागला आहे.
शहरातील नागरिकांच्या भल्यासाठी महत्वाचे निर्णय अद्याप घेण्यात आले असलेतरी ठेकदारीच्या माध्यमातून त्याची गुणवत्ता बारगळली दिसून येते आहे. पोहण्याचा तलाव बांधलेल्या शहराला पिण्याच्या पाण्याचा अभाव असलेली बाब मोठा अवघड विषय आहे.
मासळी बाजार आणि मटण मार्केट साठी झुलणारे राजकारण आणि सामाजिक कारभारी उघड्यावरील भाजीपाला बाजाराच्या प्रश्नाबाबत ओरडताना दिसत नाहीत.इंग्रज काळातील गटारीच्या मोरिला कुरकुंभ मोरी नावाने अनेक वर्ष रस्ता म्हणून वापरणाऱ्या नागरिकांना कधी सुजनपण येणार हा खरा प्रश्न आहे.
शहरातील राजकारणी समाजकारणी सेवाभावी आणि तरुणाई याचा गांभीर्याने विचार केला का? हा खरा प्रश्न असला तरी सामाजिक प्रश्नांचा खच पडला असताना स्वाभिमानी दौंडकर गेले कुठे ? अशी चर्चा तालुक्यातून होऊ लागली आहे.
……………विशेष वाचा ………..
दौंड शहरातील दोन अधिकृत बांधकाम पडण्यासाठी नगरपालिकेने दोन वेगवेगळ्या समाजसेवकाना नोटिस दिल्या दिल्या आहेत .मात्र मुख्य रस्त्याला असलेल्या अतिक्रमणाकडे पाहण्यास समाजसेवक आणि नगरपरिषदेला सुधा वेळ नाही ?




