आवाज लोकशाहीचा
स्वाभिमानी दौंडकर भाग-३
दौंड प्रतिनिधी
दौंड शहरातील राजकारण समाजकारण आणि सामाजिक चळवळीचा सावळा गोंधळ झालेला असून कोणाच्याच कामाचा प्रताप नागरी हितासाठी होत नाही,या तिन्ही गोष्टींचा मिलाफ एकच ठिकाणी होत असल्याने सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी आपण सर्व एक अशी अवस्था त्यांची सर्वश्रुत झालेली आहे. परिणाम शहरात विकास कोणाच्या तरी घरी पाणी भरतोय त्याच्या नावाने निधी आणला जातोय लोककल्याणासाठी आणि खर्च मात्र बोक्या साठी केला जातोय अशी अवस्था आहे.
शहराच्या विकासाला शासनाचा लगाम ठेवणारी नगरपरिषद खेळणे बनवलेली आहे राजकीय दाबाने तिचा सोईस्कर वापर केला जातो आहे.शहराच्या विकासाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाऊ लागलेली आहे. बांधकाम विभाग आणित्यांचे अधिकारी सरकारी कामाचा पगार घेऊन घरगडी असल्यासारखे काम करतात अशी नागरिकांची ओरड आहे. शहरात नगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पद आहे त्यांच्या बरोबर इजिनियर सुद्धा पदाची जागा आहे मात्र या दोघांना शहरात विकासाची कामे करता येत नाहीत, म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या कडे शहराच्या विकासाच्या कामांचे फंड वर्ग करून कामे करण्याचा नवा फंडा निर्माण झालेला आहे.
हा विभाग तालुक्यात कशा पद्धतीने कामे करतो याची प्रचिती सर्वांना आहे .उदाहरण म्हणून गार – दौंड नदीवरील पुलाचा एक खांब वाकडा झाला तो पडला याचा प्रामाणिक पने तपास झालेला नाही राजकीय आशीर्वादाने ते प्रकरण दडपण्यात आले आहे. असल्या विभागाने तालुक्यात मोठ्या रकमेची बांधकामे रस्ते केलेले आहेत. ही कामे करणारे अधिकारी अनेक वर्ष बदलून गेलेले नाहीत त्यांना कामाचा दांडगा अनुभव आणि त्यांचा प्रामाणिक पना येथील नागरिकांच्या कल्याणाचा विषय बनला असल्याने ग्रामीण भागातील विकास कामांबरोबर शहराच्या विकासाची सूत्रे सुद्धा त्यांच्या कडे दिली जात आहेत.
शहरात गेली अनेक वर्ष शौचालय अंतर्गत रस्ते पार्किंग सामाजिक विकास कामाची अर्धवट असलेली बांधकामे अतिक्रमणे हा विषय सोयीस्कर हाताळला जात असतो राजकीय द्वेष मनात ठेवून काहींना सवलत तर काहींवर आघात केला जातो ही गेली अनेक वर्षांची परंपरा शहरांमध्ये सातत्याने सुरू आहे या घडामोडींमध्ये शहरातील नागरिकांच्या सामाजिक सुविधांचा मोठा खर्च झाला असला तरी खर्चाच्या मानाने सुविधा त्यांना मिळालेले नाहीत ही बाब मोठी गंभीर आहे.
पालिकेचे अधिकारी या नागरी सुविधांकडे गांभीर्याने पाहत नाहीत म्हणून की काय गेले काही वर्षापासून मोठ्या रकमेची नागरी सुविधांची कामे सार्वजनिक बांधकाम उप विभागाकडे दिली जातात या प्रकाराने नगरपालिकेतील अधिकारी सामाजिक कामे करण्याच्या लायकीचे नाहीत असे दिसून येते आणि तशी चर्चा शहरातील नागरिक राजरोस करू लागलेली आहे.
शहरात कचऱ्याचा मोठा गोंधळ सुरू असताना ठेका मिळावा म्हणून एक हाऱ्या आणि त्याच टोळीचा नाऱ्या जीवाची बाजी लावून धडपड करीत आहे. कचऱ्याच्या नावाखाली आर्थिक मलिदा मिळवण्याची घाई झालेल्या हऱ्या नाऱ्याला राजकीय
आशीर्वाद देणारी अतृप्त शक्ती आपली शक्ती या साठी खर्ची घालत आहे. प्रामाणिक पणाने कचरा उचलणारा आणि शहरातील सर्वच नागरिकांना या सेवेसाठी हवा हवा वाटणारा राजू त्रिभवन ठेकदारा मात्र अलगद बाजूला काढून टाकला आहे.
बौद्ध विहराचे बांधकाम अनेक वर्ष अर्धवट पडलेले असताना शेतातील बौद्ध चळवळीतील अनेक मान्यवर आणि नेते याबाबत मनापासून चळवळीतल्या लढ्यासारखे काम करताना दिसत नाही शहरांमध्ये मोठ्या संख्येने असलेले हे बांधव आणि त्यांचे नेते बुद्धविहाराचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपाने छेडतात आणि त्यानंतर तो सोडून देतात या प्रकाराने चळवळीमध्ये काही गडबड आहे का अशा स्वरूपाची शंका व्यक्त होणे साहजिकच आहे.
सामाजिक काम करणाऱ्या अनेक संघटना महापुरुषांच्या दिवा धर्मांच्या सण उत्सवांचा जल्लोष करताना दिसतात या जल्लोसामध्ये त्यांच्या अंगी संचारलेलं बळ हे खऱ्या अर्थाने जागृत कार्यकर्त्यांचे लक्षण दिसून येतं मात्र हेच जागृत नागरिक आपल्या घराशेजारी सोयी सुविधा आणि असलेल्या अडचणींकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतात का असा प्रश्न सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अन्न वस्त्र आणि निवारा हे माणसाच्या महत्त्वाच्या गरजा असताना यामधील पाणी नावाचा महत्त्वाचा घटक या शहरातील नागरिकांना दिले अनेक वर्षापासून समाधानकारक मिळालेले नाही.
मात्र या योजनांसाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे हे येथील सर्व ज्ञात आढण्यात नागरिकांना माहिती असून सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा कोणी लढा उभारलेला नाही अशा स्वरूपाच्या या शहरांमध्ये नागरी समस्यांचे कुरण झालेला असून सामाजिक राजकीय आणि चळवळीत काम करणारे कमालीचे शांत झाले असले तरी नेत्यासाठी स्वाभिमानी झालेले दौंडकर मात्र कुठे गेले हा प्रश्न मोठा ग्रहण बनलेला आहे.



