आवाज लोकशाहीचा ..ब्रेकिंग न्युज
पाटस प्रतिनिधी राजेंद्र झेंडे
दौंड तालुक्यातील वरवंड ग्रामपंचायत च्या तीन विद्यमान सदस्यांना अपात्र ठरवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतेच दिले आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी तीन सदस्यांना अपात्र ठरवत मोठा दणका दिल्याने वरवंडसह तालुक्यातील इतर गावांतील ग्रामपंचायत गाव कारभारी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की,
वरवंड येथील राहुल लहु दिवेकर यांनी ग्रामपंचायत सदस्य फरजाना शफीक शेख (ओबीसी), कांतीलाल अर्जुन टेंगले (ओबीसी), प्रदिप किसन दिवेकर (ओबीसी), संगीता बबन सातपुते (एससी )यांनी जात वैद्य प्रमाणपत्रा बाबत आक्षेप घेत पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६९चे कलम १० (१_अ) अन्वये विवाद अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना नोटीस काढून सुनावणी निश्चित करून अर्जदार व जाब देणाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. अर्जदार राहुल दिवेकर तसेच चारही ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सदर विवाद अर्जाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १६ (२) अन्वये जिल्हाधिकारी पुणे यांनी २७ मे २०२५ रोजी
निकालपत्रात दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा अर्ज अंशतः मान्य करणेत आला. ४ पैकी एक कांतीलाल अर्जुन टेंगले त्यांचे सदस्य पद कायम ठेवत उर्वरित तीन सदस्य फरजाना शफीक शेख, प्रदिप किसन दिवेकर व संगीता बबन सातपुते यांना ग्रामपंचायत सदस्य पदी राहण्यास, भूतलक्षी प्रभावाने, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपल्यापासून म्हणजेच दिनांक-११ जुलै २०२४ पासून अपात्र ठरविणेत येत आहे. असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाच्या प्रती तहसिलदार दौंड, गट विकास अधिकारी पंचायत समिती दौंड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे (ग्रामपंचायत शाखा)
व ग्रामसेवक, ग्रामपंचायत वरवंड यांना तसेच तीनही ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आल्या आहेत. आदेशाच्या प्रती शुक्रवारी ( दि ६) वरवंड ग्रामपंचायत ग्रामसेवक व अपात्र ठरवण्यात आलेल्या सदस्यांना मिळाल्या आहेत.
दरम्यान, वरवंड ग्रामपंचायत ही तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात आहे. १७ सदस्य संख्या असलेले ही ग्रामपंचायत असुन तालुक्यातील राजकीय सत्ता समिकरणे उलथापालथ करणाऱ्याची धमक आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीतून गटा गटाच्या राजकारणाला गीलांजली देत केवळ विकासाच्या मुद्द्यावर कोणतेही गट आणि राजकारण करतात एकत्र येऊन विकास कामे मार्गी लावणारे एक वेगळी ग्रामपंचायत म्हणून वरवंड ग्रामपंचायत ची तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात ओळख आहे. या मोठी ग्रामपंचायतवर माजी आमदार रमेश थोरात गटाचे या निर्वाद वर्चस्व आहे. परत गटाचे १२ सदस्य तर आमदार राहुल कुल गटाचे ५ सदस्य निवडून आले होते. तर एक वर्षापूर्वी आमदार कूल गटाच्या मनीषा बारवकर यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर केल्याने सध्या त्यांचे पद रिक्त आहे. थोरात गटाचे प्रदीप दिवेकर यांना उपसरपंचपदावर कामकाज पाहिले आहे तर ते सध्या ग्रामपंचायत सदस्य ही होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे आमदार थोरात गटाला हा मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या संदर्भात ग्रामसेवक जालींदर पाटील यांना विचारले असता , जिल्हाधिकारी यांनी तीन सदस्य अपात्र ठरवण्याचा आदेश दिला आहे तो प्राप्त झाला आहे. ४ पैकी ३ सदस्यांचे पद हे अपात्र ठरवण्यात आले आहेत.



