जनतेच्या प्रश्नाचा झाला कहर स्वाभिमानी दौंडकर गेले तरी कुठे !

आवाज लोकशाहीचा
स्वाभिमानी दौंडकर – भाग २

दौड प्रतिनिधी

दौंड शहरातील नागरी सुविधांचा प्रश्न गहण बनत असताना राजकीय मान्यवरांनी या कडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आपल्या समर्थकांना खुश ठेवण्यासाठी आणि त्यातून त्यांच्याकडून जनतेला फसवून आपली राजकीय खर्ची अबाधित ठेवण्याची किमया गेली अनेक वर्ष जपलेली आहे.याचा विपरीत परिणाम शहरात सगळीकडे नागरी प्रश्न मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा आम्ही स्वाभिमानी दौंडकर गेले कुठे ? सद्या शहरात कचऱ्याचा प्रश्न मोठा कमालीचा झालेला आहे जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य दिवसेंदिवस आपला पसारा वाढवताना दिसत आहे . पालिका प्रशासन त्या कडे लक्ष देत नसल्याने त्याची व्याप्ती वाढू लागलेली आहे .

स्वाभिमानी अनेक दौंडकर ही व्याप्ती पाहूनही तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प बसले आहेत परिणामी साचलेल्या कचऱ्याचा परिसर उग्र वास निर्माण करून परिसरात दुर्गंधी पसरवत आहे. याचा त्रास नागरिकांच्या जीवन मानावर श्वसनाच्या आजाराला बाधक ठरू शकतो . आजारी नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी आर्थिक खर्च करावा लागणार यात शंका नाही . असा कचऱ्याचा प्रश्न दिवसा दिवस वाढत असताना शहरातील नागरिकांसाठी असणारे सर्वपक्षीय नेते नागरिकांना उल्लू बनवित एकमेकांकडे बोट दाखवत राजकारण करू लागले आहेत .


कचरा ठेका मिळवण्यासाठी एकाच नेत्यांचे दोन शिलेदारा कोण ?

कचरा साचला आहे त्याची काळजी घेण्यासाठी राजकिय मान्यवरांच्या दोन शिलेदार कचरा उचलण्याचा ठेका मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत . शहरात त्यांच्या कारभाराची चर्चा दबक्या आवाजात  होत असली तरी उघडपणे कोण बोलताना दिसत नाही,दोन आणजी पंत सद्या ठेक्यासाठी धडपडत असलेले एकाच राजकीय गटाचे भालदार आणि चोपदार आहेत , त्यांच्या आडून हा ठेका एका बिरबलाच्या घश्यात घालण्याचा  भागीरथी प्रयत्न सुरू आहे . पालिके मध्ये प्रशासकीय बदल्या झाल्याने  जुन्या कामगारांच्या बदल्या होऊन नवीन कामगार रुजू झालेले आहेत शहरातील राजकीय कुरघोडी त्यांना माहीत नसल्याने ठेका काढण्यासाठी वादीवाद होतोय का ? असा प्रश्न त्यांच्यात निर्माण होऊन ठेका काढण्यासाठी त्यांची गोची  झालेली आहे .नेतृत्वाच्या घराण्यातच हा ठेका मिळावा म्हणून पडद्याआडून मोठी कलागत नगरपालिकेच्या कारभारात सुरू झालेले आहे .

नवीन कामगारांच्या कनाला  काही खबरीलाल लागले असून आमचा नेता कसा महान याचे गुणगान या नव्या अधिकाऱ्यांच्या मागेपुढे गाताना दिसत आहेत . कचरा उचलणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे कामकाज करणारा प्रामाणिक ठेकेदार राजकीय शत्रू झाला म्हणून बाजूला करण्यात आलेला आहे .

कचऱ्याच्या ठेक्यात पैसा जास्त मिळवता येतो या आशेने ठेका मलाच मिळाला पाहिजे हा हट्ट  एका लाडक्याचा असल्याने त्याच पद्धतीची फिल्डिंग लावून कचऱ्याचे राजकारण चांगलेच तापलेले असले तरी  दौंड शहराच्या नागरिकांचा कचऱ्याचा प्रश्न मात्र दिवसान दिवस वाढत असून त्याचा विपरीत परिणाम उघडपणे सर्वत्र दिसू लागलेला आहे शहरातील स्वच्छता सध्यातरी राजकीय स्वार्थी विचाराने उकिरड्या सारखी झाली आहे.हे चित्र प्रत्येक दौंडकरांना घरातून बाहेर पडल्यावर पाहण्यास मिळते आहे . तरीही स्वाभिमानी दौंडकर म्हणून या विषयावर बोलण्याचे धाडस कोणीच करीत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल .

शहरात कचरा समस्या एवढीच शिल्लक नसून पिण्याचे पाणी गटारीचा प्रश्न  शौचालय अंतर्गत रस्ते अतिक्रमणे वाहन पार्किंग अशा महत्त्वाच्या नागरी जीवनाशी निगडित असणाऱ्या प्रश्नांना दिवसान दिवस वाढ होत असताना आणि ती शहरातील आणि शहरात येणाऱ्या प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकाला उघडपणे दिसत असताना स्वाभिमानी दौंडकर गेले कुठे हे समजत नाही .

रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्याचे साम्राज्य