आवाज लोकशाहीचा भाग – १
स्वाभिमानी दौंडकर !
दौंड प्रतिनिधी
तालुक्यात राजकीय वातावरणात नेत्यासाठी हुराळून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण होते आणि ही फौज नेत्याच्या प्रतिष्ठेसाठी शाब्दिक युद्धांच्या लढाया कधी फलकावरील लेखी मजकुराने कधी अंगातल्या टी-शर्ट वरती छापल्याने कधी जाहीर व्यासपीठावरून करण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच एक प्रयत्न आम्ही स्वाभिमानी दौंडकर या शब्दशैलीने दौंड शहरात एका विजयी सभेतून चांगला गाजला तो तालुका भर रुजूला गेला अंगात घालणाऱ्या टी-शर्ट वरून लोकांसमोर आला तो जाहीर फलकांमधून लिहिला गेला अशा दौंड तालुक्याला सध्या अनेक सामाजिक प्रश्नांचा कळस झालेला आहे आणि याकडे स्वाभिमानी दौंडकर दुर्लक्ष करतात हे उघडपणे दिसून येत आहे.या प्रकाराने खरंच स्वाभिमानी दौंडकर आहेत का असतील तर ते कुठे आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने वादळी चर्चेचा विषय बनलेला आहे.
भाग एक मधून आवाज लोकशाही च्या माध्यमातून आमच्या वाचक वर्गांसाठी नागरी समस्या आणि स्वाभिमानी दौंडकर या विषयावरती लेखन मालिका सुरू करीत आहोत. दौंड शहर हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असून या शहरात शासनाची महत्त्वाची कार्यालय आहेत तसेच शहराच्या व्यवस्थापनासाठी नगरपरिषद काम करते नगर परिषदेतील राजकीय वादळाने अनेक नागरिक समस्यांचा उकिरडा झाला असून त्याकडे पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि शासनाचे अधिकारी काम करतात की नाही हा प्रश्न या शहरातील सामाजिक कामाच्या गोंधळाचा आढावा घेतल्यानंतर उघडा होऊ शकतो.या नगरपालिकेच्या मागील पाच वर्षाच्या नगरपालिकेत शासनाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केलेली होती विशेषता कमीत कमी तीन वर्षं त्याला सेवा करावी लागते असा समज सर्वमान्य नागरिकांना माहीत आहे.
मात्र इथे वेगळेच घडले आहे गेली पाच वर्षात जवळपास एक डझन पेक्षा जास्त मुख्य कार्यकारी अधिकारी आले आणि गेले आहेत .दरम्यान काळात प्रभारी म्हणून तहसीलदार , निवासी तहसील दार यांनी सुद्धा काम केलेले आहे.पाच वर्षात एवढ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे राज्यातील पहिले उदाहरण म्हणाल्यास चुकीचे ठरणार नाही या प्रकरणाकडे पाहता १३ अधिकाऱ्यांनी कामकाज केल्याने काम करण्यास अधिकारी सक्षम न्हवते ,की शहरात राहणाऱ्या स्वाभिमानी दौंडकरांची जागृती यांना काम करू देत न्हवती हा प्रश्न उपस्थित होतो.
२०१६ च्या डिसेंबर मध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली आणि पहिले मुख्यकार्यकारी अधिकारी व्ही,एस थोरात यांनी कामकाज सांभाळले त्यांनी १ मार्च २०१६ ते २४ जून २०१९ पर्यंत कामकाज सांभाळले.त्या नंतर मात्र नगरपालिकेतील कामकाज करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतल्यास आलेले सर्व काम व्यवस्थित करीत न्हवते , की त्यांचे काम स्वाभिमान दौंडकरांना शंकास्पद होते . हा संशोधनाचा भाग आहे.
थोरात यांच्या नंतर एम बी शिंदे यांनी ९ महिने कामकाज केले.त्यांची बदली झाली शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार सचिन आखाडे यांना कामकाज करावे लागले त्यांनी १ महिना १७ दिवस कामकाज केले, त्यांच्या नंतर चंद्रकांत खोसे,(जिल्हा प्रशासन)यांनी अवघे ३ दिवस काम केल्यानंतर श्रीमती निर्मला रसिनकर(उमगर )यांनी कामकाज केले ,यांच्या नंतर कामठे नावाचे अधिकारी आले होते (पूर्ण नाव माहीत नाही)त्यांनी सुद्धा अल्प कारभार केला आणि दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी प्रभारी म्हणून कामकाज केले.यांच्या नंतर संतोष टेंगले यांना काम करण्याची संधी मिळाली होती.
मात्र त्यांना सुद्धा आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.विद्या पोळ मॅडम यांना त्यांच्या जागी यावे लागले.पोळ मॅडम यांना सुद्धा कामकाज करणे अवघड झाल्याने ठगे नावाचे अधिकारी आलेले होते त्यांना जावे लागले आणि त्यांची जागा सुषमा शिंदे यांनी घेतली त्यांनाही हा कारभारा करणे जमले नसल्याने त्यांची बदली झाली आणि विजय कावळे यांनी पदभार घेऊन धूमधडाक्यात कामाला सुरवात केली होती त्यांची धूमधडाक्याने अनेक अतृप्त आत्मे खवळले आणि त्यांची बदली केली गेली ती जागा कैलास चव्हाण प्रभारी म्हणू सांभाळत आहेत.
पंचवार्षिक काळ २२ फेब्रुवारी २०२४ मध्ये संपला आहे गेली एक वर्ष अधिक काळ या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावर नाहीत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा पूर्ण वेळे टिकला नाही. एकंदरीत पालिकेतील कामकाज अवघड आहे का? काम करण्यास प्रयत्न आलेले अधिकारी कामचुकार होते का? त्यांना काम करता येत न्हवते का? अशा अनेक प्रश्न या विषयाने गंभीर बनले आले तरी शहरातील स्वाभिमान बाळगणारी जनता मात्र कानात बोळे आणि डोळ्यावर पट्टी बांधून फिरतात का ? असा प्रश्न त्यांच्या बाबत उपस्थित होणे सामाजिकच आहे.
शहरात सध्या नागरी सुविधांचा डोंगर निर्माण झालेला आहे.पालिकेच्या निधीतील मलिदा खाण्यासाठी नेता आणि त्यांच्या आणाजी पंत कमालीचे प्रयत्न करीत आहेत.हे सर्वश्रुत असले तरी पाच वर्षात १३ अधिकाऱ्यांची वर्णी लागून सुद्धा पालिका कामाज व्यवस्थित कसे झाले नाही हा प्रश्न जेव्हा नागरिकांना डोके दुखी बनतो त्या वेळीस स्वाभिमानी दौंडकर कुठे गेले आहेत हा प्रश्न सुद्धा वादळी चर्चेचे कारण बनल्या शिवाय राहत नाही हे तितकंच खरे आहे .



