आवाज लोकशाहीचा
केडगाव प्रतिनिधी……केडगाव परिसरात अवकाळी पावसाने धुडगूस घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाने माणसानं जेवढा त्रास होतोय त्या पेक्षा अधिक जनावरांना होऊ लागलेला आहे .
सलग चार दिवसाचा पाऊस सातत्याने पडू लागल्याने पावसाचा केडगाव परिसरातील नोंदीचा आकडा आज पर्यंत २३७ मी.मी नोंदण्यात आलेला आहे .
परिणामी नागरिकांच्या घरात पाण्याचे तळे निर्माण झाले आहे .
खोपोडी गरदडे वस्तीवरील संपत बाळू गरदडे यांच्या राहत्या घरात पाण्याचा मोठा प्रवाह गेल्याने घरात तळे निर्माण झाले आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे . परिणामी या परिवाराचे जीवन विस्कळीत होऊन त्यांच्या कुटुंबाचे मोठे हाल झाले आहेत.
या गरीब कुटुंबाला शासनाने घटनास्थळाची पाहणी करून मदत केली पाहिजे अशी चर्चा सुद्धा होऊ लागलेली आहे हा प्रकार अनेक गरीबांच्या वाट्याला आलेला असून या परिवाराला चार दिवस झाले मोठ्या हाल अपेष्ठांना सामोरे जावे लागत आहे.
गेली चार दिवस सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली नसल्याने अशा अनेक कुटुंबाला पावसाचा चांगला फटका बसला आहे जनावरे उघड्यावर असल्याने त्यांची अवस्था बिकट झालेली आहे
पावसाने कहर केला असून कधी नव्हे ते ओढे नाले पाण्याने वाहू लागले आहेत .जिकडे पहावे तिकडे पाऊस आणि पाऊस दिसत असून सगळीकडे पाण्याचे साम्राज्य निर्माण झालेले दिसून येते आहे .
पावसाळा आजुन पुढे तोच पावसाचा हाहाकार..
सरासरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो अशी माहिती असते मात्र यंदा मान्सून आला की अवकाळीचा पाऊस यांचा अंदाज येण्या अगोदरच सरासरी पावसाळ्यात होणाऱ्या पावसाच्या निम्मा पाऊस झालेला आहे केडगाव भागात जवळपास २७३ मी. मी .पाऊसाची नोंद झालेली आहे .जून महिन्यात येणाऱ्या पाऊसाची सीजन प्रमाणे सुरुवात होण्या साठी जवळपास आठ दिवस वेळ आहे त्या आधीच पावसाने निम्मी सरासरी गाठलेली आहे .
तालुक्यात आता पर्यंत पडलेला पाऊस पुढील प्रमाणे (दिनांक २५ मे च्या नोंदी पुढील प्रमाणे …
यवत .७५. मी.मी. एकूण झालेला पाऊस कंसात (२१०मी.मी.)केडगाव ७४ मी. मी (२७३मी.मी.) पाटस १०४ मी.मी.(२२७मी.मी.) दौंड १६० मी.मी.(२७९मी.मी.) रावणगाव ५६ मी.मी.(१९४मी.मी.) बोरिबेल एकूण पाऊस ८७ मी.मी.
पावसाने शेतकरी कामगार व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका दिलेला असून जनजीवनावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे .जून महिन्यातील पाऊसाने हजेरी लावल्यास यंदा पाऊसाने मोठा दणका बसणार असून ओला दुष्काळा सुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही .
यवत परिसरातील ओढ्याला पाणी अचानक वाहू लागल्याने रस्ते बंद झालेले आहेत .पिंपळगाव यवत या यवत स्टेशन जवळील रेल्वे पुलाखालून जाणारा रस्ता बंद पडला आहे .पावसाने यंदा कहर केला असून ओढा नाल्यांना परग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे



