आवाज लोकशाहीचा
दापोडी प्रतिनिधी ……दौंडच्या विकास कामांचा ठेका घेणारे मोजकेच ठेकेदार असून गेली वीस वर्षा पासून त्यांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे .
याचा विपरीत परिणाम काम एकाच्या नावाने मिळालेले असते आणि दुसराच काम करीत असतो या प्रकाराने कामाची माहिती मिळवणे अवघड झाले असून काम सुरू असलेल्या परिसरातील नागरिकांना सुद्धा कामाबाबत काहीच माहिती होत नाही या प्रकाराने विकास कामानं मध्ये मोठी गडबड होऊन ठेकेदार आणि अधिकारी संगण मताने कामात भ्रष्टाचार करतात असा आरोप होऊ लागला आहे .
तालुक्यात सध्या सुमारे सात कोटी रुपयांचा बोरीपारधी दापोडी लवंगरे वस्ती साठी रस्त्याचे काम सुरू आहे .कामाचे नाव निधी आणि लोकप्रतिनिधी यांचे नाव असणारा फलक लावलेला असून या फलकावर ठेकेदाराचे नाव नाही
ठेकदराचे नाव नसल्याने कोण काम करत आहे याचा तपास सर्वसामान्य नागरिकांना लागत नाही
परिणामी काम काय काय आहे रस्ता कोणत्या प्रतीचा बनवायचा आहे त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवणार आहे याची माहिती मिळत नाही .
…….रस्त्याच्या निधी साठी खोटा सर्व्हे ……..
बोरीपारधी स्मशान भूमी पासून लवंगारे वस्तीसाठी हा रस्ता होत असताना चार किलोमीटर आणि २०० मीटर एवढा करण्यात येत आहे.
रस्ता हा अत्यंत दुर्लभ ठिकाणी असून गेले वीस वर्षात या रस्त्याने बस अथवा ट्रक अपवादात्मक गेलेली असेल मात्र रस्ता निधी मिळावा म्हणून प्रशासनाने या रस्त्याने ५९० अधिक वाहने रोज सरासरी जातात आणि येतात अशी आकडेवारी तयार केलेली आहे यामध्ये ४६ कार जीप व्हॅन आणि तीन चाकी गाड्या २६८ दुचाकी गाड्या ८९ लहान चार चाकी १६ ट्रक शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि टेलर ४२ बस ६ सायकली जनावरं वाहणाऱ्या गाड्या ५८अशी५६५ वाहनांची वर्दळ दाखवलेली आहे दुसऱ्या दिवशी ही एकूण आकडेवारी ६०५ एवढी केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी ६०० एवढी करण्यात आलेली आहे सलग तीन दिवसांमध्ये या रस्त्याने १७७० वाहनांचा प्रवास झाल्याचे दाखविलेले आहे हा सर्वे बोगस स्वरूपाचा केलेला असून या रस्त्याने दिवसा काठी चुकून सायकल स्वार सुद्धा बोरी पारधी स्मशानभूमी ते दापोडी इथपर्यंत जात नाही दापोडी रस्ता ते लंवगरे वस्तीपर्यंत शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि ट्रेलर यांची वाहतूक दिवसाकाठी एक ते दोन होणारी आहे मात्र शासनाच्या सर्वे मध्ये जी आकडेवारी दाखविण्यात आलेली आहे. तिच्या आधारे सात कोटी रुपयांच्या आसपास चा निधी चार किलोमीटर अधिक करण्याचे काम सुरू आहे.

… …… कोण ठेकेदार काम करतोय…………..
हा रस्ता तयार करण्यासाठी कोणत्या ठेकेदाराला काम मंजूर झालेले आहे याची माहिती उपलब्ध नाही मात्र सूत्राकडून समजलेल्या नुसार एकूण तीन ठेकेदारांनी मिळून तालुक्यातील जवळपास 30 कोटी रुपयांची कामे मिळवलेली आहे आणि यापैकी काही कामे दुसऱ्या ठेकेदारांना नेमून ते करीत आहेत.
शासनाच्या निधीतून होणाऱ्या सामाजिक विकास कामांच्या ठिकाणी ठेकेदार मंजूर झालेल निधी आणि कामाच्या स्वरूपाचा फलक लावणे बंधनकारक असताना तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी असे फलक अर्धवट माहिती असलेले लावले जातात परिणामी काम कोण करत आहे कामासाठी कुठला कुठला प्रकार केला जाणार आहे याची माहिती स्थानिकांना आणि गावकऱ्यांना मिळत नाही याचा फायदा काम करणारा ठेकेदार आणि त्याला सांभाळून घेणारा अधिकारी या दोघांसाठी लाभदायक असतो असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. लंगरे वस्ती आणि बोरीपारथी स्मशानभूमी पर्यंत चार किलोमीटर अधिक रस्ता हा लोककल्याणाकरता नक्कीच केला जात असला तरी या रस्त्यामध्ये अधिकारी आणि ठकेदार यांचा आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशा स्वरूपाची कार्यप्रणाली सुरू आहे अशी शंका बोरिपरधी आणि दापोडी परिसरातील नागरिक व्यक्त करू लागलेले आहेत.



