अनेक मालक बदलणारी पुनर्वसन जमीन! दलालांची नामियुक्ती, दौंडच्या गोपळवाडीतील प्रकार ,

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण … गोपाळवाडी (दौंड) मध्ये मालक बदलणारी जमीन  उघड झालेली  आहे .प्रत्यक्षात जमीन मालक बदलत नाही जमीन घोटाळ्यातून बाहेर निघावी आणि मूळ मालकाला परत मिळवणे अवघड झाल्या पाहिजे म्हणून तिची विक्री जमीन घोटाळेबाज टोळीने आपापसात संगनमताने तिचे वारंवार खरेदी विक्री केल्याचा तो प्रकार आहे .
शहराच्या परिसरातील लिंगाळी नानवीज गोपाळवाडी सोनवडी या परिसरातील  अशा अनेक पुनर्वसन जमिनी मालक बदलणाऱ्या उघड होणार आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी गोपाळवाडी परिसरातील एक पुनर्वसन जमीन मूळ मालक यांना फसवून पुण्याच्या एका दलाल याने खरेदी केलेली होती त्याने कशी खरेदी केली तो किस्सा वेगळाच शोधमोहिमेचा भाग असला तरी त्याने एका स्टँप विक्रेत्याला विकली .याने गोपाळवाडी येथील बिल्डर या बिल्डरने पुणेकर नावाच्या  बांधकाम व्यावसायिकाला, त्याच्याकडून श्रीगोंदा तालुक्यातील एका व्यावसायिकान विकत घेतली या व्यवसाय करणे परत गोपाळवाडी येथील त्याच बिल्डरला विकली ज्याने स्टॅम्प विक्रेत्याकडून घेतली होती.
या जमिनीने जवळपास पाच मालक बदललेले आहे हे सर्व बदललेले मालक एकाच टोळीसाठी काम करणाऱ्या  अलीबाबा चाळीस चोर टोळीचे सक्रिय सभासद  असून  सर्वांची दौंड शहराच्या अवतीभवती असणाऱ्या पुनर्वसन जमिनीची खरेदी विक्री करणारे आहेत .
यांचा टोळी प्रमुख  आका असू त्याला पुनर्वसन मधील एक पुणे शहरात राहणारा भामटा मदतीला असतो.
या भामट्याची धरण क्षेत्रासाठी आठ गुंठे जमीन गेलेली असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे शहरातील काही स्वतःला समाजसेवक समजणाऱ्या व्यक्तींची मदत घेऊन टोळी बनवली आणि त्या टोळीच्या आधारे अनेक गोरगरिबांच्या पुनर्वसन जमिनी लुटल्या आहेत .
तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या घोटाळ्यात आता पर्यंत ज्या ज्या दलालांनी अशा जमिनी मिळवण्यासाठी कामे केली आहेत त्या सर्वांचा म्होरक्या म्हणून त्याचे नाव प्रचलित आहे .
दौंड शहराचा  गोपाळवाडी लिंगाळी सोनवडी हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे आणि या टप्प्यातील मोक्याच्या जागा ज्या भामट्या टोळीन फस्त केलेल्या आहेत .यातून अनेक गोरगरिबांची कुटुंबे उध्वस्त झालेली आहे गोपाळवाडी लगतची जमीन मूळ खातेदार यांना अत्यंत तोकड्या स्वरूपाची रक्कम देऊन मिळवल्याची मोठी चर्चा आहे,

सध्या मूळ खातेदाराची पत्नी आणि तिची मुले या सदर्भामध्ये जमीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांची जमीन वेगवेगळ्या खातेदारांना विक्री करून परत त्यांच्यातीलच एकाने घेतल्याने एका  व्यक्तीने घेतल्याने जमिनीचे अनेक खरेदीखत केलेले आहे याचा विपरीत परिणाम कायदेशीर लढा देताना अडचणीचा होतो म्हणून जमीन अनेक व्यक्तींना विकलेली नसून जमिनीचे मालक बदलले की काय असा प्रश्न या खरेदी विक्री व्यवहारात दिसून येत आहे
.पुनर्वसन जमिनीचा घोटाळे बाज कारभार दडपण्यासाठी मोठा खटाटोप केला जातो आहे असे चित्र या प्रकरणावरून समोर येत आहे
.जमिनी वेगवेळ्या व्यक्तीला विक्री करून व्यवहार करण्याचे नाटक केले जाते हा प्रकार अभ्यासपूर्वक पाहिल्यास भ्रष्ट कारभार लपविण्यासाठी मालक बदलणारी जमीन म्हणून जमिनीला म्हणावे लागले की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे
दौंड शहराच्या परिसरातील ज्या ज्या बांधकाम व्यवसायिकांनी गेली पाच वर्षांमध्ये बांधकामे करून विकलेली आहेत त्या सर्व व्यवसायिकांच्या जमिनी कोणत्या मालकाचे आहेत याची सखोल चौकशी केल्यास बहुतांश व्यवसायिकांनी पुनर्वसनधारकांच्या जमिनी मिळवलेले आहेत तसेच त्या जमिनीवरती बांधकाम व्यवसाय उभा करण्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांना बोगस कागदपत्रे देऊन त्या अकृषिक केल्याची शंका  नाकरता येणारी नाही, हा सर्व प्रकार सध्या राजकीय आशीर्वादाने दबलेला असला तरी एक ना एक दिवस याची सखोल चौकशी होणारच अशा स्वरूपाचा विश्वास या जमीन प्रकरणाकडे पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आहे
तालुक्यामध्ये पुनर्वसन घोटाळ्यात गुंतलेले दलाल आणि त्यांचे बगलबच्चे काही पत्रकार स्टॅम विक्रेता नगरपालिकेचा एक सेवानिवृत्त अधिकारी हे भूमिगत झाले असून गेले दोन महिन्यापासून आवाज लोकशाहीच्या मधून येणाऱ्या बातम्यांमुळे त्यांची मोठी पळापळ सुरू आहे.
वरवंड गावातील स्वतःला राजकीय मान्यवर समजणाऱ्या व्यक्तीने केडगाव येथील एका दलाला हाताला धरून दौंड शहरातील एका पुनर्वसन जमिनीच्या बोगस कारभार केल्याची मोठी चर्चा सुरू झाली असून त्याबाबतचा लवकरच पंचनामा आवाज लोकशाही मधून गट नंबर मूळ मालक विक्रेते आणि घेणारे यांच्या नावासह प्रकाशित केला जाणार आहे.