दौंड :- आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण
एक हेक्टर दोन आर जमिनीच्या बदल्यात दौंड आणि हवेली तालुक्यात जवळपास २० एकर जमीन मिळवणाऱ्या पुनर्वसन लाभार्थी आणि जमीन वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करा अशा स्वरूपाचा आरडा ओरडा तालुक्यात आणि हवेलीत होतो आहे.
या बाबत हवेलीत प्लॉटिंग द्वारे जमिनी विकण्याचा घाट घातलेला असून प्रकरण न्याय मिळवण्यासाठी शासनाचे आणि न्यायालयांच्या दिशेन मार्गस्थ झालेले आहे.दासवे गावामध्ये एक हेक्टर दोन आर अशा स्वरूपाचा सातबारा असणाऱ्या एका व्यक्तीने दौंड तालुक्यामध्ये कानगाव नांदूर सहजपूर या ठिकाणी आई बहीण दोन मुले दोन सुना आणि पत्नी यांच्या नावाने सरासरी दोन एकर अधिक जमीन मिळवलेले आहे त्याच व्यक्तीने उरुळी कांचन परिसरामध्ये कुठे तीन एकर तर कुणाला दोन एकर अशा स्वरूपाने १२ एकर अधिक जमिनीचा लाभ घेतला आहे.
संबंधित व्यक्तीसाठी एक हेक्टर दोन आर जमिनीच्या बदल्यामध्ये किती जमीन प्रशासनाने त्यांना देणे अपेक्षित होते हा मुद्दाच गाडून टाकलेला दिसत आहे.
सरकारचा जावई असल्यासारखा हा व्यक्ती दोन तालुक्यांमधून जमिनी मिळून त्या विक्री करून पैसे कमवून बसलेला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उद्भवत आहे.पुनर्वसन जमिनीच्या अनेक भानगडींपैकी सर्वात भयानक स्वरूपाची ही भानगड असून याकडे प्रशासन गंभीरपणाने का बघत नाही हा खरा शोध मोहिमेचा भाग आहे.
*कांबळे कोण?*
दौंड शहराच्या परिसरातील लिंगाळी गावच्या हद्दीमध्ये कांबळे नावाच्या सधग्रस्ताच्या नावावरती काही जमीन देण्यात आलेली आहे असे कागदपत्रे दिसत असून हा कांबळे कोण याचा शोध लावणे अवघड आहे.
सामना पिक्चर मध्ये मारुती कांबळे यांचं काय झालं आशा स्वरूपाचा एक भाग स्वर्गीय कलाकार निळू फुले यांच्या भूमिकेतून साकारलेला आहे त्याच स्वरूपाचा किस्सा या कांबळे यांचा असून कांबळे नक्की कोण हे खात्रीलायक समजत नसले तरी त्यांच्या नावाचा भूखंड वरवंड आणि केडगाव येथील दोन दलालांनी घेऊन काही भूखंड बारामती येथील व्यवसायिकांना विकलेला आहे तर काही भूखंडावरती वादग्रस्त विषय शासनाच्या दरबारी सुरू आहे.
ज्यांच्या नावाचा भूखंड पुनर्वसन विभागाने अलाउड केले ते कांबळे मात्र या दोन्ही प्रक्रियेपासून कोसो दूर आहेत ते आहेत की नाहीत हा शोध मोहिमेचा भाग असला तरी कांबळ्यांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये आर्थिक व्यवहाराची उलाढाल झालेली आहे ही बाब तेवढीच पक्की असून हा व्यवहार कसा करण्यात आला याचा दाखला मिळवण्यासाठी हा कांबळे पुढे येणे काळाची गरज आहे.
कैलासवासी मनू देवजी कांबळे असे नाव समजत असून ही व्यक्ती नक्की कोणत्या धरणग्रस्त प्रकल्पामधील असून ती सध्या हयात नाही तिच्या वारसांची माहिती कशी उपलब्ध होईल याची मोठी वादळी चर्चा दौंड तालुक्यात होऊ लागलेली आहे.
कांबळे यांना लिंगाळी गावात ३०/ऑक्टोबर २०१५ मध्ये मिळालेली होती सध्या या जमिनीचा वितंडवाद शासनाच्या दरबारी सुरू आहे.
बारामती मधील एका व्यक्तीने याचा व्यक्तीच्या नावाची मिळालेली जमीन विकत घेतलेली आहे तिची विक्री कोणी केली की कांबळे यांनी केली हे कोडे उलगडत नाही त्याचा तपास सुरू आहे.
कांबळे नक्की कोणत्या प्रकल्पग्रस्त परिसरातील आहे .त्याची प्रकल्पात किती जमीन गेली त्याला किती जमिनीचा लाभ मिळणे आवश्यक होते.त्याला किती लाभ मिळाला आहे आणि सद्य स्थिती काय आहे या सर्व प्रश्न कांबळे यांच्या भोवताली फिरत आहेत.
कांबळे मात्र अनेक पुनर्वसन नागरिकांना माहीत नाही आणि माहित असल्यास कोणाला सांगता येत नाही की सांगत नाहीत या गुंत्याचा विषय झाल्याने कांबळे याचे काय झाले असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.



