दौंड:-आवाज लोकशाईचा
केडगाव प्रतिनिधी
दौंड तालुक्यात काही ठेकेदारांची मनमानी वाढलेली आहे.तालुक्यातील विकास कामाच्या खर्चाची रक्कम आणि झालेल्या कामांचा गुणवत्ता निकृष्ट असून या पाठीमागे याच ठेकेदारांची जुमले बाजी आहे.यांच्या जुमले भाजी कारभाराला प्रशासनाचे अधिकारी सुद्धा प्रचंड वैतागले असून त्यांच्या राजकीय वरद हस्ताने त्यांची मोठी गळचेपी झालेली आहे.
गेली पंधरा ते वीस वर्षात तालुक्यात काही मोजक्याच ठेकदारानी बांधकामे रस्ते यांची कामे केलेली आहेत तेच तेच व्यावसायिक कामे करीत असले तरी कामांच्या गुणवत्ता मात्र पाहिल्यास सामाजिक सुविधा साठी निधी खर्च होत नसून त्याच्या भल्यासाठी होतोय अशी अवस्था आहे.
अनेक बांधकामे कोटींच्या आकड्यांच्या खर्चाची करण्यात आली त्यांची अवस्था सध्या पहिल्याच खर्च आणि गुणवत्ता याचा मेळ बसणारा नाही .काही बांधकामे उभारलेली आहेत त्यांचा वापर नसल्याने ती खिंडार झालेली आहेत.एकाच ठिकाणच्या कामांवर तीन तीन वेळा खर्च करून सुरवातीला बांधकाम आणि नंतर दुरुस्तीचे नाव देऊन निधी खर्च केलेला आहे.
याचे दाखले पाहिजे असल्यास वरवंड गावातील सरकारी दवाखाना हातवळण गावच्या प्राथमिक आरोग्य केंदाच्या इमारती सह बोरीपारधी येथील इमारत यवत ग्रामीण रुग्णालय आणि परिसरातील काही कामे खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्र गावातील बंदिस्त आणि उघड्या गटारी शाळांची दुरुस्ती पिण्याच्या पाण्याच्या नळ योजना अनेक गावाचे झालेले रस्ते यांची प्रामाणिक पणाने चौकशी केल्यास सरकारचा पैसा सामाजिक कामांसाठी आलेल्या असताना त्यावर जुजबी खर्च दाखवून ढिसाळ गुणवत्ता करून वाया गेलेला आहे.काहीं ठिकाणचे रस्ते गेली पाच वर्षे झालेली आहेत अद्याप पूर्ण केलेले नाहीत.
तालुक्यात ही अवस्था शासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती असून राजकीय आशीर्वादाने ठेकेदार असणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या कडून कारवाई करणे अवघड होवून बसलेले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग
तालुक्यात या विभागाने हजारो कोटींची कामे केली आहेत .विभाग एक असला तरी दोन प्रकारात त्याची विभागणी झालेली आहे एक विभाग रस्ते आणि दुसरा बांधकाम म्हणून परिचित आहे .बांधकाम विभागाने गेली वीस वर्षे तालुक्यात मोठी मोठी कामे केली आहेत त्यात दौंड नदीवरील पुलांच्या बांधकामातील पिलर पडल्याची बातमी राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्याचेही सर्वांना परिचित आहे .यांचा राजकीय दबावाने कोणत्याच गवगवा झालेला नाही.
मात्र पडला कसा आणि पडेपर्यंत त्याच्या बांधकामांवर कोणी लक्ष कसे दिलेले नाही प्रशासनाच्या असल्या कामकाजावर कोणालाच शंका न्हवती का? सरकारी कामकाजाचा हा तालुक्यातील उत्तम नमुना म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही .
याच विभागाने नानवीज पोलिस ट्रेनिंग सेंटर मध्ये काही बांधकामे केलेली आहेत दौंड शहरातील राज्यराखीव पोलिस दलाच्या काही निवासी बांधकामे केली असून त्यांची सध्या अवस्था गुणवत्ते नुसार खराब आहे .ती अलीकडे दहा वर्षातील आहेत.
अनेक रस्ते पुढे करीत असताना मागे उखडले आहेत त्यातील दापोडी खुटबाव यवत लडकतवाडी पिंपळगाव यवत पांढरेवाडी बारामती रोड गार फाटा ते दौंड रोड अशा अनेक रस्त्यांची अवस्था नागरिकांच्या तक्रारीने सर्वपरिचित झालेली आहे .
तालुक्यात विकास कामे करणारी ठरावीक ठेकेदारांची टोळी असून या टोळी वितिरिक्त कोनी कामे घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
अशी नवीन परंपरा गेले काही दहा पंधरा वीस वर्षानंतर सुरू झालेली आहे आणि ती आता चालू आहे.
तालुक्यातील अनेक विकसित कामाच्या ठेकेदारांची आजपर्यंत झालेली यादी काढल्यास यामध्ये ठराविकच ठेकेदारांची या तालुक्यांमध्ये विकास कामासाठी मोठी दहशत निर्माण झालेले आहे असेच चित्र स्पष्ट होईल या ठेकेदारांनी कामे घेऊन ते अन्य छोट्या मोठ्या ठेकेदारांना द्यायची आणि त्यातून कमिशन कमावण्याची नवीन प्रथा गेले दहा-वीस वर्षात सुरू झालेले आहे या प्रथेमुळे गुणवत्तेदार काम या तालुक्यामधील सांगणे अवघड झालेले आहे अशा स्वरूपाची वादळी चर्चा सर्व गावातून होऊ लागलेली आहे बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचाराला राजकीय असणे पीडित असणारे ठेकेदार आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे अधिकारी कारणीभूत आहे अशी सुद्धा तक्रार राजरोसपणे होऊ लागलेली आहे.
सामाजिक विकासाच्या नावाखाली या तालुक्यांमध्ये प्रचंड स्वरूपाचा निधी आणला गेलेला असून या निधीतून होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबतचा प्रश्न मोठा ग्रहण आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.



