दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण
दौंड गोपाळवाडी रोड वरील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रवेशद्वारा जवळील चौकाच्या समोरील असणाऱ्या भूखंडाच्या पुनर्वन जमिनीवरील गौडबंगाल नक्की काय आहे.याचा मूळ लाभार्थी आणि सध्याचे मालक कोण आहेत याचा प्रवास मोठा गोंधळाचा आहे अशी ओरड सुरू झाली आहे या भूखंडाचे श्रीखंड नक्की कोण खाण्याच्या तयारीत आहे असा गमतीशीर टिंगलीचा विषय या निमित्ताने वादळी झालेला आहे .
मूळ पुनर्वसन जमीन धारकाने जमीन मिळवताना शासनाला फसवले आहे.आणि त्याला सध्या असलेल्या मालकानी त्यांना फसवले आहे अशी ओरड राजरोस पने होत असून नक्की जमिनीची भानगड काय आहे हा प्रश्न गुंतागुंतेचा झालेला आहे.
शहरातील महत्वाच्या ठिकाणचा हा भूखंड असल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या भूखंडावर राजकीय आशीर्वादाने पुढारलेल्यानी शासनाच्या काही अधिकारी आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या भालदार चोपदारांच्या मदतीने मिळविलेले आहेत असा आरोप केला जातो आहे.
सुरवातीला पॉलिटिंग करून विकण्याचा घाट घातला होता यातून बऱ्याच व्यवसायिकांनी येथे बांधकामे करून व्यवसाय उभारलेले आहेत यामध्ये हॉस्पिटल हॉटेल या बरोबर बँक उभारताना व्यवसायिक बांधकाम करणारी परवानगी कशी आणलेली आहे हा सुद्धा कळीचा प्रश्न आहे .
शहरात तीन बांधकाम व्यवसायिकांनी पुनर्वसन जमिनी कवडीमोल किमतीत घेऊन इमारती उभारून विकलेल्या आहेत.त्यांनी व्यवसाय म्हणून केलेल्या हा प्रकार योग्य असला तरी ज्या पुनर्वसन लाभार्थीने जमिनी कवडीमोल भावात विकल्या त्यांनी शासनाचा लाभ दोन दोन ठिकाणी जमिनी घेतल्याचे दिसून आलेले आहे असा आरोप होतोय.
त्यांनी सरकारला फसवून जमिनी मिळवल्याने कवडीमोल भावात विकल्या असल्या तरी जमीन मिळवल्या पासून विक्री करे पर्यंत कोणत्या भानगडी झाल्या यात मोठा घोटाळा लपलेला आहे असा आरोप या निमित्ताने होतो आहे
शहरातील अनेक पुनर्वसन जमिनींची अश्याच प्रकाराची भानगड असून मूळ लाभार्थी आणि सध्याचे असणाऱ्या भूखंडाच्या मालक यांचा मधला प्रवास धक्कादायक झालेला आहे अशी राजरोस पने चर्चा होत आहे.पुनर्वसन घोटाळ्यात तालुक्यातील अनेक जमिनी गुरफटलेल्या असून त्या साठी अनेक दलाल त्यांचे बगलबच्चे स्टँप विक्रेते शासनाचे नोकरदार यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
पुनर्वसन साठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या आणि वाटप करताना मात्र त्यात मोठा घोटाळा केला असल्याने ज्यांच्या जमिनी पुनर्वसन साठी ताब्यात घेतल्या त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे असे म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही.सध्या ज्यांच्या जमिनी पुनर्वसन साठी शासनाने घेतल्या त्यांना जमीन गेल्याचे दुःख आहे आणि ज्यानी घोटाळे करून मिळवल्या त्यातून कमाई केलीं त्यांच्या आनंदाला सीमा नाही अशी अवस्था तालुक्यात दिसून येते.
जमीन घोटाळे करणारा तालुका म्हणून सध्या गाजू लागला असला सध्या चौकशी सुरू आहे ती प्रामाणिक पणे झाल्यास तालुक्यातील किमान दलाल त्यांचे भालदार चोपदार आणि टोळीतील भामटे शंभर अधिक तुरुंगाचे प्रवासाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या मध्ये दौंड शहरातील मोठ्या टोळीचा समावेश असून सध्या तीन बांधकाम व्यावसायिक स्टँप विक्रेता आणि बांधकाम परवानगी देणाऱ्या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा नंबर प्रथम असू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे.
*विशेष महत्वाचे वाचा*
जन्माला येण्या अगोदर पुनर्वसन जमिनीच्या लाभार्थी दोन भगिनी झाल्या असल्याने त्यांची जमीन तीन बांधकाम व्यवसायिकांनी कश्या घेतल्या आणि त्या पाठीमागे नक्की काय गडबड केलेली आहे याची लवकरच माहिती आवज लोकशाही मधून पुढे आणली जाणार आहे.या तीन बांधकाम व्यवसायिकांनी जमिनी घेऊन दोन ठिकाणी बांधकामे करून विक्री केली आहेत एक ठिकाणी बांधकाम सुरू केलेले असून या तिन्ही ठिकाणच्या बांधकाम साठी शासनाच्या परवानग्यांची कागदपत्रे लवकरच उघड केली जाणार असून दूध का दूध आणी पाणी का पाणी केले जाणार आसल्याने घोटाळ्यातील घोटाळा म्हणून या व्यावसायिकांच्या कारभाराचा भांडा फोड लवकरच उघड केला जाणार आहे.



