दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण
बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या पुनर्वसन जमिनी अकृषिक करून बांधकामे करण्याचा गोरख धंदा दौंड मध्ये सुरू आहे.काहींनी बांधकामे करून विकली काही करू लागले असून काही अकृषिक करण्यासाठी प्रशासनाकडे फाईल दाखल केलेल्या आहेत.मुळातच बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जमिनी बांधकामासाठी अकृषिक केल्यावर चोराचा विषय साव होऊ शकतो अशी हुशारी हा प्रकार पाहिल्यावर दिसून येतो आहे.
अकृषिक जमिनी करताना शासनाच्या तिजोरीत काही रक्कम जमा करावी लागते याला चलन म्हणतात चलन बँकेत शासनाच्या नावाने भरलं की आपण केलेले काम नंबर एक आहे.असा आदरभाव या बांधकाम व्यावसायिकांचा झालेला आहे.एकदा जमीन अकृषिक झाली की उजळ माथ्याने जमिनीवर व्यावसायिक आणि निवासी संकुलने बांधतात यातून भख्खळ माय कमवून परत अश्याच जमिनी मिळवण्यासाठी काम करतात.
दौंड शहरात काही मोजकेच ग्रुप असून यात काही भाऊ मंडळी प्रसिद्ध आहेत.हसून बोलायचं चहा नाष्टा करणारा का? म्हणून आपले पणाचा अभाव दाखवायचा माणुसकीचा जिव्हाळा आहे असे दाखवून दुसऱ्या बाजूला कुठे जमिनी घोटाळ्यातील मिळतील का? यावर लक्ष ठेवायचं असा दात काढीत सुरू असलेल्या त्यांचा धंदा तालुक्यात आणि शहरात प्रसिद्ध आहे.
पुनर्वसन जमिनी त्यांनी मोठ्या प्रमाणात घेऊन अकृषिक केल्या आणि करण्यासाठी काम करीत आहेत.गिरीम गोपाळवाडी परिसरात नव्याने एका बिल्डरचा पसारा सुरू आहे.पुनर्वसन जमिनीची घोटाळे बाज जमीन घेऊन इमले बांधण्याचे काम करू लागला आहे.
शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल लगतच पुनर्वसन जमिनी अश्याच भानगडीतील असून या जमिनीची विक्री खरेदी कशी झाली याची चौकशी झाल्यास अनेक स्वतःला समाजसेवक समजणारे भामटे उघड झाल्याशिवाय राहणार नाही या जागेत बिल्डरने आपल्या राजकीय मैत्री आणि आर्थिक देवाणघेवाण असणाऱ्या संबंधातून जमीन मिळविल्याची मोठी चर्चा आहे.
सदर जमीन पुनर्वसन मधील कोणत्या लाभार्थीला मिळाली आहे.या लाभार्थ्यांची धरणक्षेत्रात किती जमीन गेलेली होती.त्या बदल्यात त्याला किती जमीन मिळणे आवश्यक होते आणि त्याला मिळाली किती,एकाच ठिकाणी मिळालेली आहे की अजून कुठे त्याने मिळविलेली आहे.असे अनेक प्रश्न महालक्षी हॉस्पिटलच्या लगतच्या पुनर्वसन भूखंडाकडे पाहून निर्माण होत आहेत याची कसून चौकशी झाली पाहजे अशी मागणी होऊ लागलेली आहे.
*पुनर्वसन जमिनी अकृषिक करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा!*
अकृषी जमिनी करण्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्मचारी यांच्याकडून पुनर्वसन जमिनीच्या संदर्भामध्ये प्रामाणिक पणाने कागदपत्रांची तपासणी केली जात नाही तसेच या जमिनी कशा मिळवलेले आहेत त्याबाबतची सखोल चौकशी करीत नाही जमिनीय कृषी करण्यासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या कागदपत्रांमध्ये तलाठी मंडलाधिकारी तहसीलदार तसेच मोजणी ऑफिसर यांच्या कागदपत्राकडे पाहून कामकाज केले जाते.
मात्र या जमिनीमध्ये तलाठी मंडळ अधकारी आणि पुनर्वसन अधिकारी यांच्या बेजबाबदार पणामुळेच लाभार्थींना त्या वाटप झालेले असतात ताबा दिलेला असतो परिणामी सुरुवातीलाच केलेली चूक अखेरपर्यंत तशीच राहते आणि त्यावरती त्या प्रमाणामध्ये अकृषी करून बांधकाम व्यवसायाच्या घशात घातल्या जातात हे प्रामाणिकपणाने पडताळल्यास या जमिनीवर कृषी होऊ शकणार नाही अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे.जी सध्या अकृषिक जमिनी करण्याचा प्रकार सुरू आहे त्यामध्ये अधिकारी आर्थिक लाभापोटी कागदपत्रांची प्रामाणिकपणाने तपासणी करीत नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केला असून या विभागात मी काम केलेला आहे आता फक्त नाव सांगू शकत नाही अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिल्याने पुनर्वसन जमिनी अकृषी केल्याची सर्व जमिनी परत प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून तपसाव्या अशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण होतो आहे.
*पुनर्वसन जागेतील लक्षवेधी बंगला आणि परमिट रूम!*
दौंड शहरात एका मोठ्या उद्योजकाने पुनर्वसन जवळपास १३ एकर अधिक जमीन विकत घेतलेली असून या जमिनीच्या खरेदी विक्रीचे मोठी कहाणी आहे.खरेदीदार याने भव्य बंगाल आणि परमिट रूम बांधून वैभव उभारलेले असले तरी जमीन मिळविणाऱ्या कुटुंबाला जमिनी कशी मिळाली आणि तिची विक्री कशी झाली हा प्रश्न मोठा गमतीचा आहे.
दलाल आणि त्यांच्या टोळीने केलेला प्रताप या उद्योजकाने पैसे देऊन खुश केले असलेतरी ज्याची जमीन विकत घेतली त्याची फसवणूकच केली आहे या जमिनीची सविस्तर माहीत लवकरच आवाज लोकशाहीचा मधून प्रसारित करणार आहोत .



