दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- विजय चव्हाण
मंदिर परिसरातील सोयी सुविधांच्या खर्चाला आर्थिक अडचण निर्माण झाल्याने काही दिवस देवाचे दागिने ठेऊन पैसे घेणाऱ्या यात्रा कमिटीची आणि गावातील काही ग्रामस्थांची शाब्दिक चकमक उडाल्याची घटना घडली आहे.या चकमकीला शांत होण्यासाठी गावात दोन दिवस मीटिंग घेण्यात आली काही वेळ आरोप प्रत्यारोप आणि गोंधळ होऊन परत हा प्रकार होऊ नये अशा प्रकारचा निर्णय एक विचाराने घेऊन विषयाला पूर्णविराम देण्यात आला आहे.

नानगाव,(दौंड) येथील हा प्रकार असून या प्रकरणाने दोन दिवस गावात वादळी चर्चा होऊन सोशल मीडियावर याचा धुमाकूळ झाल्याने अर्थाचा अनर्थ होत गेला आणि माहित नसलेल्या विषयाचे वादळ गावआणि वाडी वस्त्यांवर घराघरापर्यंत जाऊन धडकले होते.
या बाबत सविस्तर माहिती अशी की गावची ग्रामदैवत रासाई देवी यांच्यासाठी असलेल्या दागिन्यांची कमी यात्रा वेळी देवीच्या अंगावर दिसली आणि दागिने कुठे गेले ही चिंता गावात काहींनी व्यक्त केली याचा परिणाम राजकीय गटांच्या वादविवादा प्रयत्न गेला.
नानगाव गावात दोन राजकीय गट कार्यरत आहेत.या पैकी एक गटाने दागिने काय झाले या बाबत पुजारी यांना विचारण्यासाठी मीटिंग बोलावली होती.देवीच्या पूजेचा मान दोन कुटुंब सांभाळतात एक एक वर्ष हा मान असल्या कुटुंबात संजय विठल गायकवाड,आणि त्यांच्याच कुटुंबातील राजेंद्र सुरेश गायकवाड असा परिवार आहे दोघेही चुलत भाऊ नात्याने आहेत.
दोघांनी एक एक वर्ष सेवा करण्याची प्रथा आहे.गेली तीन पिढ्या त्यांनी सेवा सुरू असून याकाळात देवी साठी भाविकांनी आणि ग्रामस्थानी सुवर्ण अलंकार केलेले आहेत.देवी उत्सव वेळी हे दागिने देवीच्या अंगावर घातले जातात आणि उत्सव संपल्यानंतर ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले जातात त्या लॉकरची चावी जो सेवा करतो त्या पुजाराकडे असते.
देवीच्या अंगावरील दागिने नुकत्याच झालेल्या यात्रा उत्सवात कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावातील एका गटाने ज्याच्याकडे देवीच्या पूजेचा मान होता त्या संजय याला मीटिंग मध्ये बोलावून विचारना केली यावेळी पुजारी यांनी दिपवाळीला ही व्यवस्था माझ्याकडे आलेली होती त्यावेळी मी देवीच्या दागिन्यांबाबत पाहिले असता यात दागिने कमी आहे अशी मी राजेंद्र विचारले होते त्याचे दागिने यात्रा कमिटी यांच्या कडे दिले आहेत वेळ आल्यावर सांगेल असे सांगितले आहे अशी माहिती दिली होती.
दागिने सध्या किती आहेत किती नाहीत हे पाहिले पाहिजे अशा स्वरूपाचा विषय मीटिंग मध्ये निघाल्याने संजय यांनी शेजारी असल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकर मधून दागिने आणले आणि यादी प्रमाणे मीटिंग मधील उपस्थित असलेल्या गावकऱ्यान समोर मोजमाप केले या वेळी त्या मध्ये अंदाजे १२ तोळे वजनाचे दोन दागिने नसल्याचे निदर्शनास आल्याने याचे काय झाले याची माहिती राजेंद्र याला विचार असा सूर निघाला होता.
राजेंद्र मीटिंगला उपस्थित नसल्याने त्या फोन वरून विचारण करण्यात आली होती त्यांनी यात्रा कमिटी मधील संदीप खळदकर,विकास शेलार,शेखर खळदकर यांच्या कडे दिलेले आहे अशी माहिती दिली होती.
या पूर्वी देवीच्या दागिन्याला यात्रा कमिटीने हात लावलेला न्हवता प्रथमच हा प्रकार समजल्याने मीटिंग मध्ये या विषयावर वादळी चर्चा झाली गावाला हा नवीन प्रकार सुरू झाल्यास देवीच्या दागिन्यांचा वापर या पुढे येणाऱ्या प्रत्येक यात्रा कमिटीने केल्यास काय करणार अशा पद्धतीचा तक्रारी सूर निघाल्याने मोठा गोंधळ झाला होता.

पत्रकाराचा फोन आणि सुरू झाली गडबड!
गावात देवीचे दागिने गायब झालेत या विषयाची माहिती आवाज लोकशाहीच्या प्रतिनिधीला मिळालेली होती.मीटिंग साठी उपस्थित असलेल्या प्रतिनिधीने यात्रा कमिटीत असणाऱ्या आणि राजेंद्र याने सांगितलेल्या संदीप खळदकर यांना फोन करून गावात देवीचे दागिने तुम्ही घेऊन गेलात तो विषय नक्की काय आहे अशी विचारणा केल्यावर मीटिंग कोणी घेतली आम्हाला माहीत नाही असे आवाक होवून विचारणं केली आणि म्हणाले पाच दहा लोकांना घेऊन कोणी देवळात बसेल त्याला मीटिंग म्हणतात का? असा प्रश्न उपस्थित करीत याच विषयावर उद्या मीटिंग होईल तुम्हीण्य सर्व माहिती मिळेल असे सांगितले.
देवीच्या दागिन्याने गावात मात्र सोशल मीडियावर खात्रीशीर माहिती नसलेल्या विचाराचे वादळ उठेल होते त्याचा प्रसार गावभर आणि वाड्या वस्त्यांवर झाला होता
दुसरी मीटिंग आणि वादळी चर्चा
दुसरी दिवशी त्याच ठिकाणी यात्रा कमिटी आणि त्यांच्या गटाच्या गावकऱ्यांनी मीटिंग घेतली या ठिकाणी सुद्धा आवाज लोकशाहीचा प्रतिनिधी उपस्थित होते मीटिंग मध्ये काल मीटिंग कशी घेतली आम्हाला का बोलावलं नाही या वादळी विषयाने सुरवात केली गेली यावेळी संदीप खळदकर यांनी आणिं त्यांच्या समर्थकांनी मोठा शाब्दिक खल केला या मीटिंगला संजय आणि राजेंद्र दोन्हीं पुजारी उपस्थित होते.
दोघांनी तोंडाला चिकटपट्टी लावलेली होती .वादळी चर्चा आरोप प्रत्यारोप काही काळ चाललेल्या मीटिंग मध्ये संदीप यांनीं यात्रेच्या काळा देवीच्या मंदिरासमोरील काही सुशोभीकरणाचे काम अपूर्ण राहिले होते त्यासाठी आर्थिक टंचाई जाणवली होती यात्रा तोंडावर आल्याने आणि काम अपूर्ण असल्याने हे कर्ण काळाची गरज होती म्हणून यात्रा कमिटीच्या साक्षीने आम्ही दोन दागिने हे बँकेत ठेवून आर्थिक स्रोत उपलब्ध करीत काम पूर्ण केले आहे आणि हा सर्व प्रकार केला आहे अशी माहिती पहिल्या मीटिंगमध्ये बसलेल्या काही प्रतिष्ठित नागरिकांना दिलेली होती येणाऱ्या पौर्णिमेला विधीवर्त पूजा करून ते दागिने आम्ही परत देवीच्या अंगावर घालणार होतो अशी माहिती देऊन दागिन्याची काय झाले या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
याच वेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सी बी खळदकर यांनी देवीच्या दागिन्यांचा वापर यापुढे कसल्याही कामासाठी करायचा नाही यापूर्वी असं घडलेलं नाही यापुढेही घडू नाही अशी सर्वांनी दक्षता घ्यावी असा समजूताचा सूर व्यक्त करीत या प्रकरणाला थांबवण्याच्या सूचना केल्या अर्धा तासाच्या वादग्रस्त मीटिंगमध्ये दोन दिवस देवीच्या दागिन्याचा चाललेल्या चर्चेचा वादळ पूर्णपणे शमून शांत झाले.
विशेष हे वाचा
ग्राम दैवतेच्या पूजेसाठी असलेले दोन पुजारी गावच्या राजकारणाप्रमाणे हे दोन गटात विभागल्याचे चित्र यावेळी दिसून आले पहिल्या मीटिंग साठी संजय हे उपस्थित होते तर दुसऱ्या मीटिंगसाठी संजय बरोबर राजेंद्र हेही उपस्थित होते.दैवताची पूजा करणारे ही व्यक्ती गावच्या गटातटाच्या राजकारणामुळे विभागली गेली की काय असा प्रश्न त्यांच्या हालचालीवरून आणि त्यांच्या वर्तनावरून जाणवत होता.



