पाटस ॲट्रॉसिटी प्रकरणात सरपंच,सरपंच पती सह इतर आरोपींचा अटक पुर्व अर्ज बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला!

बारामती:आवाज लोकशाहीचा
दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच तृप्ती दादा भंडलकर,सरपंच पती दादा जनार्दन भंडलकर,संभाजी किसन चव्हाण यांच्यासह इतर तीन आरोपींचा जामीन बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने ना मंजुर केला आहे.
पाटस येथील पत्रकार राजेंद्र झेंडे यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारे दुकान विद्यमान सरपंच,सरपंचाचे पती व इतर २१ जणांच्या बेकायदा जमावाने जातीय देशातून आणि राजकीय सूडबुद्धीने तोडफोड करून दुकानातील ४ लाख ९७५०० रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणातील सरपंच तृप्ती दादा भंडलकर, सरपंच पती दादा जनार्दन भंडलकर, संभाजी किसन चव्हाण, सुनिल उर्फ दिगंबर शितोळे, झहीर सत्तार शेख, स्वप्निल गणपत निंबाळकर या सहा आरोपींनी बारामती जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
दरम्यान फिर्यादी राजेंद्र झेंडे यांनी बातम्या दिल्याचा राग मनात धरून राजकीय सुडबुद्धीने तसेच गावातील इतर कोणाचे ही अतिक्रमण न काढता केवळ जातीय द्वेषातून दुकानाची तोडफोड करून त्यांचे कुटुंबांचे उदरनिर्वाह करणारे साधन उध्वस्त करून दुकानातील साहित्य व रोख रक्कम अशी ४ लाख ९७ हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाल चोरून घेऊन गेल्याची घटना १२ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती.
ही गंभीर घटना घडूनही यवत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.
पत्रकार राजेंद्र झेंडे यांनी पाटस पोलीस चौकी समोर कुटुंबासह १७ मार्च २०२५ रोजी धरणे आंदोलन केल्यानंतर यवत पोलीस ठाण्यात १८ मार्चला ॲट्रॉसिटी सह विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दादा जनार्दन भंडलकर व इतर पाच जणांनी बारामती जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता.
यासंदर्भात बुधवारी (दि २३) बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने हा अर्ज ना मंजुर करीत निर्णय दिला. फिर्यादी राजेंद्र झेंडे यांच्या वतीने अँड सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अँड शुभम निंबाळकर, यांनी अँड प्रशांत पवार,अँड मयंक रणशृंगारे,अँड सागर सोनवणे यांच्या सहकार्याने युक्तिवाद केला. तर आरोपींच्या वतीने अँड अमर काळे यांनी युक्तिवाद केला होता.तर फिर्यादी तर्फे अँड शुभम निंबाळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय न्यायालयाने आरोपीचा चा जामीन अर्ज नामंजुर केला आहे.
दरम्यान,मागील महिनाभरापासून सदर गुन्ह्यातील आरोपी हे बिनधास्त पणे मोकाट फिरत होते.पोलिसांना कल्पना असुन ही पोलिसांनी अटक करण्याचे टाळले.गुन्हा दाखल करण्यास ही यवत पोलिसांनी टाळाटाळ केली होती. आता सदर गुन्ह्यातील आरोपींना पोलिस अटक करणार का ? राजकीय दबावामुळे त्यांना मोकाटच ठेवणार? असा प्रश्न आता उपस्थित आहे.
दरम्यान,सदर आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दौंड शहर व तालुक्यातील सर्व पक्षीय दलित व आंबेडकरी संघटनांनी दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस यांना निवेदन देऊन दिला आहे.


