………..आवाज.लोकशाईचा दणका….………
दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- विजय चव्हाण
एका महिन्यात धमाका करतो असे आश्वासन पुनर्वसन जमीन बाबत जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्याने दलाल आणि त्यांच्या टोळीची मोठी धांदल उडालेली आहे.आपल्याला यातून आक्का वाचवेल अशी असणारी त्यांची अपेक्षा या आश्वासनाने फोल ठरली असून आता प्रकरण थांबवणार कसे यासाठी त्यांनी देव पाण्यात घातलेले आहेत.
> *आवाज लोकशाहीचा पाठपुरावा !*
आवाज लोकशाहीचा मधील बातम्या सुरू झाल्याने सुरवातीला याने काय होणार आपल्या पाठीमागे राजकीय आशीर्वाद आहे.अशी टिप्पणी करणाऱ्या दलाल आणि त्यांच्या टोळीने गेली महिनाभरात दौंड तहसील कार्यालयाचा प्रवास केला नाही.अधिकाऱ्यांना आक्का ची भीती दाखवून काही खातेदार बोगस आणि त्यांचे आदेश सुद्धा बोगस आणून जमिनी मिळवणाऱ्या मध्ये केडगाव यवत नानगाव कानगाव पाटस पारगाव या गावांमधील भामट्यांनी अनेक प्रकरणे पथ्यावर पाडून घेतली यात स्वतःला नेता म्हणून घेणारे आहेच पण आम्ही खास माणसे आहोत म्हणून लाभ घेणारे गावातील स्वयंभू कार्यकर्ते सुद्धा मागे नाहीत.सध्या या जमिनी बाबत सखोल चौकशीचे काम सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आले असल्याने बऱ्याच भानगडी यातून उघड होण्याची शक्यता निर्माण झाल्याने डूडी यांनी धमाका करतो असे जाहीर रित्या सांगितले आहे.या सर्व प्रकार आवाज लोकशाहीच्या माध्यमातून बातम्यांच्यां मध्यातून सातत्य ठेवल्यानेच झाला आहे यात मात्र शंका नाही.
> *मुंबई उच्च न्यायालयाचे ही याबाबत लक्ष !*
आक्का च्या भरवश्यावर शासन स्तरावर हे प्रकरण थांबवता येईल असा विश्वास यातील.काहीना ठाम असल्याने अजूनही दबक्या आवाजात काही होणार नाही अशी समजूत स्वतःची स्वतःच काहीजण काढू लागले आहेत.तालुक्यात असे यवत वरवंड केडगाव दापोडी कानगाव आणि पुण्यातून तालुक्यात येणाऱ्यानं मध्ये असून त्यांनी उसने आश्वासन आणून हा विषय हळुवार पने हाताळण्याचे काम सुरू केले आहे.मात्र उच्च न्यायालयाने सुद्धा हा विषय गंभीर पने घेतला असून याची माहीत त्यांनी मागवलेली आहे.राजकीय आशीर्वादाने याला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला तरी न्यायालयातील कामकाज यांना थांबवता येईल का ? हा एक त्यांच्या साठी डोकेदुखीचा विषय म्हणावा लागेल.
एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला न्यायालय अशा इकडे आड तिकडे विहीर या म्हणी प्रमाणे पुनर्वसन प्रकरणाचा प्रवास सुरू झाला आहे.
दौंड तालुक्यात ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले असतील त्यांना यातून कोण ?वाचवणार हे पाहण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावे लागेल यात जरी शंका नसली तरी आवाज लोकशाहीचा या प्रकरणाचा पाठपुरावा सातत्याने केल्याशिवाय राहणार नाही यात शंका बाळगण्याचे कारण नाही.!



