पुनर्वसन जमिनी बाबत एक महिन्यात धमाका करणार …जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी यांची ग्वाही!

दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी: विजय चव्हाण

दौंड पुनर्वसन जमिनी घोटाळ्याबाबत एक महिन्यात धमाका करणारा आहे.मला याची सर्व माहिती मिळालेली आहे असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आवाज लोकशाहीचा प्रतिनिधीला बोलताना दिली आहे.

आवाज लोकशाहीने पुनर्वसन जमिनी बाबतच्या बातम्यांचा संच डूडी यांना देताना विजय चव्हाण

अखेर आवाज लोकशाहीने पुनर्वसन घोटाळ्या बाबत उठवलेल्या आवाज डूडी यांच्या पर्यंत गेला आणि त्यांनी धमाका करतोय असे आश्वासन दिले आहे.या वेळी त्यांच्या बरोबर दौंड उपविभागीय अधिकारी मीनाज मुल्ला तहसीलदार अरुण शेलार नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

दौंड नगरपालिकेच्या आढावा बैठकी साठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी त्यांना लोकशाहीच्या वतीने पूर्वसन घोटाळ्याच्या आलेल्या बातम्यांचा संच देण्यात आला त्या वेळी त्यांनी वरील माहिती दिली आहे.दौंड तालुक्यात पुनर्वसन जमिनी लुटणारी टोळी काही वर्ष काम करीत आहे.त्यातून त्यांनी बोगस आदेश बोगस खातेदार दाखवून जमिनी मिळवल्या आणि विक्री केल्या आहेत.विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक दलाल राजकीय आशीर्वादाचे लाभार्थी आहेत.

दौंड तालुक्यात दौंड शहरालगत असणाऱ्या जमिनीवरती पुण्यात राहणाऱ्या काही दलालांच्या मदतीने स्थानिक राजकारण्यांनी मोठी लूट करीत मलिदा कमविलेला आहे.
स्वतःला समाजसेवक समजणाऱ्या बहादरांनी आपल्या चेळ्याचपत्यांच्या मध्यस्थीने मोठा गोंधळ घालीत जमिनी बळकवल्या यामध्ये मोठी माया कमवून समाजसेवक असल्याचा निर्वाळा निर्माण केलेला आहे.

दौंड शहरामध्ये काही बिल्डर पत्रकार नगरसेवक यांचाही यामध्ये मोठा वाटा असून अनेकांनी आम्ही तसे नाहीत असे चित्र निर्माण करीत या जमिनीच्या माध्यमातून मोठी लूट करीत जणू दरोडे घातले आहेत.

स्टॅम्प विक्रेता नगरपालिकेतील तत्कालीन अधिकारी यांनी या सर्वांच्या भानगडी चा पुरेपूर मोबदला घेऊ स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत या सर्व घडामोडी मध्ये मात्र ज्यांच्या जमिनी यांनी लुटल्या लुबाडल्या फसवून घेतल्या त्या गोरगरिबांचा विषय अनंत अडचणीचा सुरू  आहे.

दौंड शहरामध्ये आणि परिसरात आजही प्लॉटिंग करून विकणाऱ्या जमिनीच्या व्यापाऱ्यांचा सखोल अभ्यास करून माहिती घेतल्यास हे सर्व एकाच टोळीतले सरदार सुभेदार आहेत असे चित्र उघड झाल्याशिवाय राहणार नाही.काहींनी या जमिनी विकल्या त्यातून पैसे कमवले आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन जमिनी घेऊन आपला हुशारीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

तालुक्यातील सोनवडी लिंगाळी गोपाळवाडी आलेगाव खोरवडी गार या भागातील पुनर्वसन जमिनीची खरेदी आणि विक्री हे याच टोळीतल्या दलालांनी केलेली असून याची सखोल माहिती करता या टोळीपैकी बरेच लोक तुरुंगात केल्याशिवाय राहणार नाहीत मात्र यासाठी तपासणी अधिकारी याच्या अंगी प्रामाणिकपणा असणे काळाची गरज आहे अशा महाकाय घोटाळ्यात पुनर्वसन मध्ये दौंड तालुक्यातील हा प्रकार राज्यामध्ये सर्वाधिक जमीन घोटाळ्याचा म्हणून सुद्धा गाजू शकतो अशा स्वरूपाची खात्री या ची सखोल आणि प्रामाणिक चौकशी केल्यास मिळेल यात शंका नाही.