दौंड:- आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण
पगारापेक्षा अधिक पैसे मिळवण्याच्या मागे शासनाचे सर्वच स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची स्पर्धा लागल्याने याचा विपरीत परिणाम समाज व्यवस्थेवर होऊ लागला आहे.कोणाच्या आयुष्यात आर्थिक फटका कोणाला रस्त्यावर जीव गमवावा लागत आहे.हा प्रकार थांबवणे अवघड आहे कारण राज्यकर्तेच लुटारू झाले आहेत असे म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही यासाठी आवाज लोकशाही मधून भ्रष्ट कारभाराबाबत
मालिका भाग- ३
कार्ड कमाईचा धंदा आरटीओ कडून फक्त बारामतीत होतोय असे नाही.पुणे अहिल्यानगर सोलापूर सातारा या जिल्ह्यात सुद्धा हीच प्रथा आहे आणि यासाठी त्यांना यंत्रणा सुद्धा असते पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर या ठिकाणी महामार्गावरील एक खासगी एजंट कार्ड काढण्यास पुढाकार घेतो त्याच्याकडे पुणे सोलापूर महामार्गावर धावणाऱ्या तसेच पुणे सातारा पुणे अहिल्यानगर पुणे सोलापूर काही अंश मुंबई पुणे या ओव्हरलोड वाहनांची जबाबदारी कार्डच्या माध्यमातून घेतो या कार्डमाके त्याला काहीसा आर्थिक लाभ सुद्धा मिळतो अशा स्वरूपाची चर्चा ओव्हरलोड वाहतूकदारांकडून समजते सध्या हा धंदा मोठा तेजीत असो यापासून मिळणारी मिळकत या विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पगारापेक्षा अधिक कमाई करून देणारा विषय आहे.
या विभागाला शासनाचा केसेस करण्यासाठी ठराविक कुठे असतो यासाठी त्यांचे फिरते पथक काम करते मात्र पथक खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने कारवाई करायचे सोडून पर प्रांतीय वाहतूकदार गाडी मालक यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करते मात्र त्यांना सुद्धा आता सध्या या कार्ड पद्धतीने दिलासा मिळालेला आहे म्हणून सर्वसामान्य वाहतूकदार सुशिक्षित बेकरांनी सुरू केलेले शेतीमालाचे वाहतूक स्थानिक पातळीवर ती घर बांधण्याचे साहित्य अशा छोट्या-मोठ्या गाड्यांवरती काही कागदपत्राची उणीवा करीत केसेस केले जातात यातून सर्वसामान्य आणि सरळ मार्गे काम करणाऱ्या व्यक्तींना मोठा त्रास होतो आणि कार्ड देऊन ओव्हरलोड पणे मर्द वेगात नंबर प्लेट नसणाऱ्या माती चोर मुरूम चोर अशा वाहनांना अभय दिले जाते अशा स्वरूपाची या विभागाची कामगिरी पगारापेक्षा जास्त पैसे कमावण्यासाठी कार्ड नावाचा फंडा वापरते अशी मोठी ओरड आहे..
हे वाचा
दौंड तालुक्यात श्री सिमेंट कंपनीतून ओव्हरलोड वाहतूक राजरोस पणे केली जाते साधारण रोज या कंपनीतून २०० च्या आसपास ओव्हरलोड गाड्या रात्रदिवस बाहेर पडतात या सर्व गाड्यांचे सेटिंग कार्ड मधून करण्यात आलेला आहे आणि अन्य वाहतूकदारांना ओव्हरलोड वाहतूक केली नाही तर काम मिळत नाही आणि भाडे सुद्धा परवडत नाही कंपनी ने सर्व वाहतूकदारांना समान न्याय दिला पाहिजे वाहतूक समान करण्यासाठी योग्य भाडे दिले पाहिजे आणि त्या साठी या विभागाने वाहन मालक ट्रान्सपोर्ट वाले कंपनीच्या वाहतूक विभागाची एक बैठक घेऊन याचा निर्णय केला पाहिजे अशा स्वरूपाची अपेक्षा पाटस येथल श्री कंपनीच्या बाबत होऊ लागलेली आहे.



